मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sangli News : जुन्या भांडणाच्या रागातून तरुणाचे अपहरण करून खून, सांगली जिल्ह्यातील आष्टा तालुक्यातील घटना

Sangli News : जुन्या भांडणाच्या रागातून तरुणाचे अपहरण करून खून, सांगली जिल्ह्यातील आष्टा तालुक्यातील घटना

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 06, 2023 03:19 PM IST

Sangli News: सांगली जिल्ह्यात आष्टा तालुक्यात जुन्या भांडणाच्या रागातून एका तरुणाचा खून करण्यात आल्याचे उघड झाले आहे.

Crime
Crime

सांगली : आष्टा तालुक्यात शहराला हादरवून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. जुन्या भांडणाच्या रागातून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. त्याला लाथा बुक्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्याचा मृतदेह हा शहरातील स्मशानभूमीत जाळून टाकून विल्हेवाटलावण्यात आली. पोलिसांनी शिताफीने आरोपींना अटक केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

ओमकार ऊर्फ छोट्या भानुदास रकटे (वय २४, मूळ गाव बावची, सध्या रा. डांगे कॉलेजचा परिसर, आष्टा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. सम्मेद संजय सावळवाडे (वय २६, रा. सावळवाडे गल्ली, आष्टा), भरत चंद्रकांत काटकर (वय ३६, रा. कदमवेस आष्टा), राकेश संजय हालुंडे (वय २३, केला. आवटी गल्ली, आष्टा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सावळवाडे आणि काटकर हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंधरा दिवसांपूर्वी सम्मेद संजय सावळवाडे व ओंकार ऊर्फ छोट्या रकटे यांच्यामध्ये करकोळ कारणावरून भांडण झाले होते. याच भांडणाचा राग मनात धरून फेब्रुवारी महिन्यात आरोपी सावळवाडे, काटकर आणि हालुंडे यांनी ओमकारचे अपहरण केले. त्यानंतर ओमकारला घेऊन हे तिघे शहराच्या पूर्वेला असलेल्या लोकमान्य शाळेजवळ नेत त्या ठिकाणी त्याला मारहाण केली. त्यानंतर त्याचा गळा आवळून खून केला आणि त्याचा मृतदेह जाळून टाकला होता.

दरम्यान याबाबतची फिर्याद ओंकार याचा मित्र सूरज प्रकाश सरगर (वय २१, रा. शेळके मळा, आष्टा) याने आष्टा पोलिस ठाण्यात दिली होती. त्यानुसार पोलिसांनी शिताफीने आरोपींना अटक केली. तपासा दरम्यान, सम्मेद सावळवाडे, भरत काटकर व राकेश हालुंडे या तिघांनी ओंकार रकटे हे आरोपी असल्याची माहिती मिळाली. त्यांना पॉलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्हा कबूल केला.

IPL_Entry_Point

विभाग