मराठी बातम्या  /  Nation And-world  /   Cbi Reaches Former Cm Rabri House Deputy Cm Tejashwi Is Also Present

Rabadi Devi : मोठी बातमी ! बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या घरावर सीबीआयच्या धाडी

CBI raids Rabri Devi's residence in Patna
CBI raids Rabri Devi's residence in Patna
Ninad Vijayrao Deshmukh • HT Marathi
Mar 06, 2023 12:20 PM IST

CBI raids Rabri Devi's residence in Patna : बिहारच्या माझी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या घरावर सीबीआयने धाडी टाकल्या आहेत. त्यांच्या सोबत तेजस्वी यादव देखील उपस्थित होते.

पाटणा : बिहारची राजधानी पाटणा येथे बिहारच्या मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या घरावर सीबीआयने धाडी टाकल्या आहेत. या घटनेने खळबळ उडाली आहे. आज सकाळ पासून सीबीआयचे पथक राबडी देवी यांच्या घरात शोध घेत आहेत. मात्र, तपास कशाबद्दल केला जात आहे, याची गुप्तता पाळण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी जमिनीच्या बदल्यात रेल्वेमध्ये नोकरी देण्याच्या आमिषाने अनेक तरुणांची फसवणूक करण्यात आल्या प्रकरणी २४ ठिकाणी सीबीआयने धाडी टाकल्या होत्या. ज्यावेळी लालू प्रसाद यादव मुख्यमंत्री होते, त्यावेळी रेल्वेत बोगस भरती राबवण्यात आली होती. सर्व नियम धाब्यावर बसवून जमिनी घेऊन तरुणांना नोकरीचे खोटे सांगण्यात आले होते.

ट्रेंडिंग न्यूज

नोकरीच्या बदल्यात जमीन घोटाळा

सीबीआयने २३ सप्टेंबर २०२१ रोजी हा घोटाळा उघडकीस आणला होता. सीबीआयने केलेल्या तपासात रेल्वे भरतीचा हा घोटाळा पुढे आला होता. यानंतर सीबीआयने १८ मे २०२२ रोजी या प्रकरणी एफआयआर दाखल केली होती. यात माजी केंद्रीय मंत्री आणि उपमुख्यमंत्री लालू प्रसाद यादव, रबडी देवी, मिसा भारती, हेमा यादव यांच्या सोबत अनेकांची नावे होती. लालू प्रसाद यादव जेव्हा रेल्वे मंत्री होते तेव्हा रेल्वेमध्ये नोकरी देण्या आधी उमेदवारांकडून जमिनी घेण्यात आल्या. लालू, रबडी आणि मिसा यांना राउज एव्हेन्यू कोर्टाने समन्स जारी केले होते. सीबीआयच्या चार्ज शिटमध्ये या सर्वांना १५ मार्च रोजी न्यायालयात हजर होण्यास सांगण्यात आले आहे.

दरम्यान, आरजेडीचे वरिष्ठ नेता, आणि प्रवक्ता मृत्युंजय तिवारी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी सरकार तपास यंत्रणेचा चुकीचा वापर करत असल्याचा आरोप केला आहे.

आयआरसीटीसी घोटाळा प्रकरणी या पूर्वी कोर्टाने १४ आरोपींना समन्स दिले होते. काही दिवसांपूर्वी लालू प्रसाद यादव नुकतेच सिंगापूरहून किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करुन भारतात आहे आहेत. रेल्वेतील नोकरीच्या बदल्यात जमीन लाच म्हणून स्वीकारल्याच्या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. सीबीआयनं या प्रकरणी चार्जशीट दाखल केली आहे. लालू प्रसाद यादव यांचे निकटवर्तीय माजी आमदार भोला यादव, ह्रदयानंद चौथरी यांच्यावर देखील आरोप आहेत. भोला यादव यांना सीबीआयनं २७ जुलै रोजी अटक केली होती. भोला यादव हे २००४ ते २००९ मध्ये लालू प्रसाद यादव यांचे ओएसडी होते. या प्रकरणी लालू प्रसाद यादव यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी १.०५ लाख स्क्वेअर फुट जागेवर कब्जा केल्याचा आरोप आहे.

WhatsApp channel

विभाग