मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Chandani Chowk : चांदणी चौकातील पूल पाडण्यासाठी वाहतुकीत बदल; पाहा बदललेल्या मार्गांची संपूर्ण लिस्ट

Chandani Chowk : चांदणी चौकातील पूल पाडण्यासाठी वाहतुकीत बदल; पाहा बदललेल्या मार्गांची संपूर्ण लिस्ट

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Oct 01, 2022 09:50 AM IST

chandani chowk pune bridge news : चांदणी चौकातील पूल आज २०० टन स्फोटकांचा वापर करून पाडण्यात येणार आहे. त्यामुळं आता शहरातील वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे.

chandani chowk pune bridge demolition
chandani chowk pune bridge demolition (HT)

chandani chowk pune bridge demolition : पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या चांदणी चौकातील उड्डाणपूल आज मध्यरात्री पाडण्यात येणार आहे. यासाठी २०० टन स्फोटकांचा वापर केला जाणार आहे. याशिवाय हा पूल पाडताना २०० मीटरचा परिसर संपूर्णत: निर्मनुष्य केला जाणार आहे. त्यामुळं आता ही स्थिती लक्षात घेता पुणे वाहतूक पोलिसांनी शहरातील वाहतुकीत मोठा बदल केला आहे. पूल स्फोटकांद्वारे पाडण्यात येणार असल्यानं या कामावेळी आणि त्यानंतर राडारोडा उचलण्याची कार्यवाही होईपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना तेथून प्रवास करण्यास मनाई करण्याचे आदेश पुणे शहराचे वाहतूक पोलीस उपायुक्त राहूल श्रीरामे यांनी जारी केले आहेत.

वाहतुकीतले हे बदल आज रात्री ११ वाजल्यापासून ते उद्या सकाळी आठ वाजेपर्यंत लागू असणार आहेत. त्यामुळं आता शहरातील नागरिकांना आणि प्रवाशांना यामुळं मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे.

कसा असेल वाहतुकीतला बदल?

१. मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील मुंबईकडून येणारी जड वाहतूक ही ऊर्से टोलनाका येथेच थांबविण्यात येणार आहे.

२. साताऱ्याकडून येणारी जड वाहतूक ही खेड शिवापूर टोलनाक्याजवळ थांबविण्यात येणार आहे.

३. मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील शिंदेवाडी ते ऊर्से टोलनाका या दरम्यान दोन्ही बाजूने सर्व प्रकारच्या जड वाहनांच्या वाहतूकीस बंदी घालण्यात येणार आहे.

४. मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील डुक्कर खिंड ते पिंपरी चिंचवड आयुक्तालय हद्दीतील घोडावत चौक या दरम्यान दोन्ही बाजून सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतूकीस बंदी राहील.

मुंबईहून साताऱ्याकडे जाणाऱ्या हलक्या व प्रवासी चारचाकी वाहनांसाठी आहेत हे मार्ग...

१. मुंबईकडून येणारी हलकी व प्रवासी चारचाकी वाहने ऊर्से टोलनाका येथून जुन्या पुणे- मुंबई रस्त्याने भक्ती शक्ती चौक, नाशिक फाटा, बोपोडी चौक, इंजिनीअरींग कॉलेज चौक, संचेती चौक, खंडोजीबाबा चौक, टिळक रोडने जेधे चौक, पुणे सातारा रोडने कात्रज चौक, सरळ जुना कात्रज बोगदामार्गे साताऱ्याकडे किंवा कात्रज चौक, नवले पूल डावीकडे वळून मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग

२. वाकड चौक डावीकडे वळून राजीव गांधी पुलावरुन विद्यापीठ चौक, संचेती चौक, उजवीकडे वळून खंडोजीबाबा चौक, टिळक रोडने जेधे चौक, पुणे सातारा रोडने कात्रज चौक, सरळ जुना कात्रज बोगदामार्गे साताऱ्याकडे किंवा कात्रज चौक, नवले पुल डावीकडे वळून मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग

३. राधा चौक डावीकडे वळून बाणेर रोडने विद्यापीठ चौक, उजवीकडे वळून संचेती चौक, उजवीकडे वळून खंडोजीबाबा चौक, टिळक रोडने जेधे चौक, पुणे सातारा रोडने कात्रज चौक, सरळ जुना कात्रज बोगदामार्गे साताऱ्याकडे किंवा कात्रज चौक, नवले पुल डावीकडे वळून मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग

साताऱ्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या हलक्या व प्रवासी चारचाकी वाहनांसाठी हे तीन मार्ग आहेत...

१. खेड शिवापूर टोलनाका, शिंदेवाडी, जुना कात्रज बोगदा, कात्रज चौक, पुणे सातारा रोडने जेधे चौक, डावीकडे वळून सारसबाग, पुरम चौक, डावीकडे वळून टिळक रोडने खंडोजीबाबा चौक, फर्ग्युसन रोडने वीर चाफेकर चौक, डावीकडे वळून विद्यापीठ चौक, राजीव गांधी पुलावरुन औंध वाकड रोडने वाकड चौक, डावीकडे वळून पुढे यु टर्न घेऊन मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग

२. खेड शिवापूर टोलनाका, शिंदेवाडी, जुना कात्रज बोगदा, कात्रज चौक, डावीकडे वळून नवले पूल, वडगांव पूल अंडरपास, सिंहगड रोडने राजाराम पूल, डी.पी. रोडमार्गे नळस्टॉप, लॉ कॉलेज रोड, सेनापती बापट रोड, विद्यापीठ चौक, राजीव गांधी पुलावरुन औंध वाकड रोडने वाकड चौक, डावीकडे वळून पुढे यु टर्न घेऊन मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग

३. खेड शिवापूर टोलनाका, शिंदेवाडी, जुना कात्रज बोगदा, कात्रज चौक, डावीकडे वळून नवले पूल, वडगांव पूल, वारजे पूल अंडरपास, आंबेडकर चौक, वनदेवी चौक, कर्वे पुतळा चौक, नळस्टॉप, लॉ कॉलेज रोड, सेनापती बापट रोड, विद्यापीठ चौक, राजीव गांधी पुलावरुन औंध वाकड रोडने वाकड चौक, डावीकडे वळून पुढे यु टर्न घेऊन मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग.

IPL_Entry_Point