मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Zakir Naik : झाकिर नाईकच्या साथीदाराची सहा वर्षांनंतर निर्दोष सुटका; कोर्टाचा मोठा निकाल

Zakir Naik : झाकिर नाईकच्या साथीदाराची सहा वर्षांनंतर निर्दोष सुटका; कोर्टाचा मोठा निकाल

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Oct 01, 2022 09:25 AM IST

Arshi Qureshi Case : झाकिर नाईकसोबत काम केलेल्या अर्शी कुरैशी याला २०१६ मध्ये यूएपीए कायद्यांतर्गत अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता सहा वर्षांनंतर त्याची सुटका करण्यात आली आहे.

Arshi Qureshi Case
Arshi Qureshi Case (HT)

Arshi Qureshi Case : तरुणांना अतिरेकी संघटना आयसिसमध्ये जॉईन करण्यासाठी प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली अर्शी कुरैशी याला २०१६ मध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता त्याची सहा वर्षांनंतर पुराव्याअभावी सुटका करण्यात आली आहे. अर्शी यानं झाकिर नाईक यांच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनमध्ये काम केलेलं आहे.

राष्ट्रीय तपास संस्थेनं २०१६ मध्ये अटक अर्शी कुरैशीला अटक केल्यानंतर त्याच्यावर २०१७ साली यूएपीए कायद्यांतर्गत कारवाई केली होती. तरुणांना अतिरेकी संघटनेत जॉईन होण्यासाठी प्रोत्साहन दिल्याचा आणि धर्माचा वापर करून अतिरेकी कारवाया केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता. त्यानंतर आता त्याच्याविरोधात कोणतेही पुरावे न सापडल्यानं एनआयएच्या विशेष कोर्टानं त्याला ३० हजारांचा दंड करत कुरैशीची सुटका केली आहे.

कुरैशी अशा कोणत्याही कारवायांमध्ये सहभागी नव्हता. एनआयएनं त्याच्यावर कोणत्याही पुराव्याविना आणि कोणताही तपास न करता त्याला अटक केलेली आहे. असा युक्तिवाद कुरैशीच्या वकिलांनी कोर्टात केला होता. एनआयएनं सादर केलेल्या आरोपपत्रातही सक्षम पुरावे नसल्यानं कोर्टानं अर्शी कुरैशी यांची सहा वर्षांनंतर आरोपांतून सुटका करण्याचा निकाल दिला आहे.

दरम्यान लोकांचं धर्मपरिवर्तन करणं आणि अतिरेकी कारवायांसाठी लोकांना प्रोत्साहित केल्याच्या आरोपांखाली इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर भारतात बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतर झाकिर नाईक यांचाही शोध केंद्रीय तपास यंत्रणांकडून गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. नाईक हे इंडोनेशियात असल्याचं अनेक रिपोर्ट्समधून समोर आलेलं आहे.

IPL_Entry_Point

विभाग