मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sanjay Raut : ‘नूपुर शर्मांची हकालपट्टी पण महाराजांची बदनामी करणाऱ्यांवर कोणताही कारवाई का नाही?’

Sanjay Raut : ‘नूपुर शर्मांची हकालपट्टी पण महाराजांची बदनामी करणाऱ्यांवर कोणताही कारवाई का नाही?’

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Nov 27, 2022 09:16 AM IST

Saamna Editorial : छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र विसरून महाराष्ट्राला नामर्द बनवण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याचा मोठा आरोप संजय राऊतांनी शिवसेनेवर केला आहे.

Sanjay Raut On BS Koshyari
Sanjay Raut On BS Koshyari (HT)

Sanjay Raut On BS Koshyari : राज्यपाल भगतसिंक कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी सामनाच्या अग्रलेखातून भाजप आणि केंद्रातील मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. याशिवाय वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांची हकालपट्टी केली जाते, परंतु भगतसिंक कोश्यारी आणि सुधांशू त्रिवेदी यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नसल्याचं सांगत शिवसेनेनं सामनातून भाजपला पुन्हा घेरलं आहे.

काही दिवसांपूर्वी प्रेषित मुहम्मद पैगंबर यांच्याबाबत भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर या प्रकरणाचा इस्लामी व अरब देशांनी निषेध केल्यानंतर भाजपनं तात्काळ नुपूर शर्मांची पक्षातून हकालपट्टी केली. मात्र, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करूनही त्यांचं पक्षाकडून समर्थन केलं जात आहे. त्यांचा कुणी केसही वाकडा केलेला नाही. ते अजूनही पक्षात आणि पदांवर कायम आहेत. त्यामुळं महाराष्ट्राला नामर्द बनवण्याचे कारस्थान तडीस नेले जात आहे, असं म्हणत संजय राऊतांनी भाजपवर जोरदार प्रहार केला आहे. याशिवाय उसळून उठण्याचीही महाराष्ट्राची क्षमता कमी होत असल्याचंही सामनातून म्हटलं आहे.

सावकरांचा अपमान झाल्यानंतर शिंदे गट आणि भाजपनं ज्या पद्धतीनं आक्रमकता आणि जोश दाखवला तेवढाच तो महाराजांची बदनामी झाल्यानंतर दाखवला नाही. याउलट अशा प्रवृत्तींचं भाजपकडून समर्थन करण्यात आलं. त्यामुळं महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र विसरून नामर्द बनवण्याचं कारस्थान सुरू असल्याचं सांगत शिवसेनेनं भाजपवर सडकून टीका केली आहे.

IPL_Entry_Point