मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Rape Case : नराधम मामाकडून भाचीवर बलात्कार; संतापजनक घटनेनं औरंगाबाद हादरलं

Rape Case : नराधम मामाकडून भाचीवर बलात्कार; संतापजनक घटनेनं औरंगाबाद हादरलं

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Nov 27, 2022 08:49 AM IST

Rape Case In Lasur Station : भांडे घासत असलेल्या भाचीला घरात बोलावून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची घटना औरंगाबाद जिल्ह्यातील लासूरमध्ये घडली आहे.

Rape Case In Aurangabad
Rape Case In Aurangabad (HT_PRINT)

Rape Case In Aurangabad : सख्ख्या मामानं आपल्याच भाचीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. त्यामुळं औरंगाबाद जिल्ह्यातील लासूर स्टेशन परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी मामाला अटक केली आहे. काही दिवसांपूर्वीच औरंगाबाद शहरात युवतीशी गैरवर्तन केल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता लासूरमध्ये मामानंच भाचीवर बलात्कार केल्याची घटना घडल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन परिसरातील गोपीनाथनगरमध्ये राहत होती. तरुणी घरी एकटीच असल्यानं तिला लगतच दायगांवमध्ये राहणारा मामा भेटायला आला. त्यावेळी तरुणी घरातील कामं आवरत होती. आरोपी मामा घरात येऊन बसला आणि त्यानं आपल्याच भाचीला दुसऱ्या खोलीत बोलावलं. मामा बोलावत असल्यानं भाचीला हा प्रकार सुरुवातीला लक्षात आला नाही. परंतु त्यानंतर मामानं भाचीसोबत जबरदस्ती करत बलात्कार केला. याशिवाय याबाबतची माहिती कुणाला दिल्यास जीवे मारण्याचीही धमकी दिली. पीडित तरुणीचं लग्न झालेलं असून तिला दोन मुली आहेत. त्यानंतर हा सर्व प्रकार तिच्या नातेवाईकांना कळताच त्यांनी शिल्लेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

दरम्यान काही दिवसांपासून औरंगाबाद शहरात सातत्यानं हत्याकांडाच्या घटना समोर येत होत्या. त्यामुळं शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यानंतर आता सख्ख्या मामानंच भाचीवर बलात्कार केल्याची घटना समोर आल्यानं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला अटक केली. पुढील तपास शिल्लेगांव पोलीस करत आहेत.

IPL_Entry_Point