मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Marathi News 27 November 2022 Live: Raj Thackeray : महापालिका निवडणुकीत ताकदीने उतरा; ही निवडणूक जिंकायचीच आहे,राज ठाकरे यांचा निर्धार

Mumbai: Maharashtra Navnirman Sena (MNS) chief Raj Thackeray (PTI)

Marathi News 27 November 2022 Live: Raj Thackeray : महापालिका निवडणुकीत ताकदीने उतरा; ही निवडणूक जिंकायचीच आहे,राज ठाकरे यांचा निर्धार

02:19 PM ISTNov 27, 2022 07:49 PM Atik Sikandar Shaikh
  • twitter
  • Share on Facebook

Marathi News Live Updates: Raj Thackeray : Raj Thackeray Nesco Sabha : मनसे अध्यक्ष राज ठाकरे गोरेगावच्या नेस्को मैदानावर मनसेचे गटाध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्तांना मार्गदर्शन करणार आहेत. या सभेत ते कुणावर तोफ डागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबई महानगर पालिका, राहुल गांधी यांचे सावरकर यांच्यावरील वक्तव्य तेसच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराज यांच्यावर केलेली टीका या बद्दल ते सडेतोड बोलणार अशी चर्चा आहे.

Sun, 27 Nov 202202:01 PM IST

राज्यातल्या निवडणुकांबाबद संभ्रमाचे वातावरन; या निवडणुकांच्या तयारीला लागा; राज ठाकरे

राज्यात कोरोनामुळे महानगर पालिकेच्या निवडणुका लांबल्या आहेत. राज्यात सध्या गोंधळाचे वातावरण आहे. कोरोनामुळे निवडणुका परत पुढे गेल्या. आता पर्यंत कुठून तरी कानावरती येते की पुढच्या फेब्रुवारी मार्चमध्ये निवडणुका परत लागतील. सध्या महाराष्ट्राचा इतका सगळाच सगळ्या बाजूंनी गोंधळ झालेला आहे. या गटाला मान्यता मिळणार का नाही मिळणार ? त्या गटाला मान्यता मिळणार की नाही मिळणार? या मुद्यावरून त्यांना त्यांची डोकी खाजवू द्या. निवडणुकांच्या तयारीसाठी म्हणून या पुढे आपल्याला विधानसभा प्रमाणे मार्गदर्शन होईलच. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष स्थापन करून जवळपास १६ ते १७ वर्षे झाली. या काळात सर्वाधिक आंदोलन मनसेने केली. या आंदोलनाचा जणीव पूर्वक विसर पडला जात आहे, ही आंदोलने आपल्याला विसरू द्यायची नाही. त्यामुळे या पुढे प्रत्येक शहरांमध्ये आपल्या सर्व गटाध्यक्षांचे मिळावे घ्यावेत असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले.

Sun, 27 Nov 202211:51 AM IST

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ धडाडणार; गोरेगावच्या नेस्को मैदानावर जाहीर भाषण

Raj Thackeray Nesco Sabha : मनसे अध्यक्ष राज ठाकरे गोरेगावच्या नेस्को मैदानावर मनसेचे गटाध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्तांना मार्गदर्शन करणार आहेत. या सभेत ते कुणावर तोफ डागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबई महानगर पालिका, राहुल गांधी यांचे सावरकर यांच्यावरील वक्तव्य तेसच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराज यांच्यावर केलेली टीका या बद्दल ते सडेतोड बोलणार अशी चर्चा आहे.

Sun, 27 Nov 202209:06 AM IST

मुसळधार पावसामुळं भारत-न्यूझीलंड सामना रद्द; टिम इंडियाच्या स्वप्नांचा चुराडा

IND vs NZ 2nd ODI : भारत आणि न्यूझीलंडमधील दुसरा एकदिवसीय सामना संततधार पावसामुळं रद्द करण्यात आला आहे. न्यूझीलंडमधील हॅमिल्डनच्या सेडॉन पार्कमध्ये ही मॅच होत होती. परंतु सामना सुरू होताच पावसानं जोर धरला. परिणामी मॅच रद्द करण्याचा निर्णय पंचाना घ्यावा लागला. आता भारताला सिरिज बरोबरीत सोडवण्यासाठी पुढील सामना जिंकणं गरजेचं आहे.

Sun, 27 Nov 202208:52 AM IST

सदानंद कदम यांना ईडीचं समन्स; अनिल परबांच्या अडचणीत वाढ

Sadanand Kadam : माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना ईडीनं मनी लाँड्रिंग प्रकरणात समन्स बजावलं आहे. काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारनं परबांच्या दापोलीतील साई रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आता कदम यांना ईडीनं समन्स बजावल्यानं अनिल परबांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Sun, 27 Nov 202202:03 AM IST

Raj Thackeray : मनसेची तोफ आज धडाडणार; मुंबईत आज राज ठाकरेंची जाहीर सभा

Raj Thackeray Rally In Mumbai : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज मुंबईतील नेस्को मैदानावर जाहीर सभा होणार आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यांचा विषय उचलत औरंगाबादेत शेवटची जाहीर सभा घेतली होती. त्यानंतर आता राजकीय चित्र बदललं असून आजच्या सभेत राज ठाकरे कुणावर निशाणा साधणार, याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे.

Sun, 27 Nov 202202:00 AM IST

Mumbai Railway Mega Block : मुंबईत आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक; लोकलच्या वेळापत्रकात बदल

Mumbai Local Mega Block : रेल्वे रुळांच्या दुरुस्ती आणि देखभालीच्या कामासाठी आज मुंबईत रेल्वे प्रशासनानं मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेतला आहे. त्यामुळं ऐन वीकेंडच्या दिवशीच प्रवाशांची गैरसोय होणार आहे. माटुंगा-मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. तर दुसरीकडे सीएसटी-चुनाभट्टी-वांद्रे आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.