मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Rajya Sabha Election : ‘दोन दिवस ईडी आमच्याकडे द्या, भाजप आम्हाला मतदान करेल’

Rajya Sabha Election : ‘दोन दिवस ईडी आमच्याकडे द्या, भाजप आम्हाला मतदान करेल’

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
Jun 12, 2022 10:43 AM IST

संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत
शिवसेना खासदार संजय राऊत (हिंदुस्तान टाइम्स)

राज्यसभेच्या (Rajya Sabha) निवडणुका (Elections) पार पडल्या आहेत. मात्र एकामागोमाग एक आरोप प्रत्यारोप सुरुच आहेत. आता राज्यसभेचा सहावा उमेदवार निवडून आणण्यात शिवसेना (Shiv Sena) अपयशी ठरली ती निवडणूक हरल्याची सल अजूनही शिवसेनेत कायम असल्याचं पाहायला मिळतंय. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत ‘फक्त ४८ तास ईडी आमच्याकडे द्या देवेंद्र फडणवीस आणि भाजप आम्हाला मतदान करेल’ असं सांगत नव्या वादाला तोंड फोडलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

काय म्हणालेत संजय राऊत?

‘आमच्या हातात जर ईडी दिली तर देवेंद्र फडणवीसही शिवसेनेला मतदान करतील, आम्हाला काय म्हणायचं आहे हे अपक्षांना माहिती आहे. महाराष्ट्रात रात्रीच्या अंधारात काय सुरु होतं याची सगळी माहिती आमच्याकडे आहे. कोणाचं मत कसं बाद करायचं यावर कशी चर्चा सुरू होती. हे सगळं आम्हाला माहिती आहे पंकजा मुंडेंना एकाकी पाडण्याचा डाव आहे. आम्हाला पंकजा मुंडेंची चिंता आहे. आणि आम्हाला चिंता करण्याचा अधिकार आहे. मुंडे कुटुंबाचं आणि शिवसेनेचं जिव्हाळ्याचं नातं आहे. मुंडे कुटुंबाचं आणि शिवसेनेचं जिव्हाळ्याचं नातं आहे’, शिवसेनेचे खासदार संजय राऊत पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

तर १५ जून रोजी ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी बोलावलेल्या बैठकीसंदर्भात राऊत यांना विचारलं असता त्यांनी शिवसेनेसह बिगर भाजप राज्यातल्या सर्व प्रमुख नेत्यांना ममत बॅनर्जी यांनी आमंत्रण दिलं आहे असं राऊत म्हणालेत. शिवसेना त्या बैठकीला हजर राहाणार असल्याचं राऊत म्हणाले आहेत. मात्र ही बैठक फक्त राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकासाठी नसून इतरही अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर ही बैठक होणार असल्याचं राऊत म्हणालेत.

 

सामनामधूनही सोडण्यात आले टीकेचे बाण

शिवसेनेच्या मुखपृष्ठ असणाऱ्या दैनिक सामनामधूनही भाजपवर आगपाखड करण्यात आली आहे.

दिल्लीतला सत्ताधारी पक्ष या निवडणुका जिंकण्यासाठी किती बेमालुमपणे केंद्रीय यंत्रणांचा वापर करतो हे पुन्हा एकदा पाहायला मिळालंय. महाराष्ट्र आणि हरियाणात याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळालं. राज्यसभा निवडणुकांची मांडव परतणी सुरु असतानाच त्याच मांडवात विधान परिषदेचे ११ उमेदवार उभे राहिले आहेत. मतांचं गणित हाताशी नसताना भाजपने दोन जास्त उमेदवार उभे करावे याचा अर्थ त्यांना घोडेबाजारात हरभरे टाकायचे आहेत. महाराष्ट्राचं राजकारण बिघडवायचं आहे. राज्यसभा आणि विधान परिषदा मिळून किती कोटींचा धूर निघाला? विधान परिषदा व्हायच्या असल्या तरी यावर पैजा लागल्या आहेत. दिल्लीत व्यापाऱ्यांचं राज्य आल्यावर निवडणुका महाग झाल्याच पण निवडणुका जिंकण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर सुरु झाला

असं सामनात म्हटलं गेलंय.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या