मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Railway mega block : डेक्कन क्वीन, सिंहगड एक्सप्रेससह मुंबईला जाणाऱ्या अनेक गाड्या २५ व २६ तारखेला रद्द

Railway mega block : डेक्कन क्वीन, सिंहगड एक्सप्रेससह मुंबईला जाणाऱ्या अनेक गाड्या २५ व २६ तारखेला रद्द

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Nov 24, 2023 11:21 AM IST

Railway megablock: शिवाजीनगर आणि खडकी स्थानकांदरम्यान विविध तांत्रिक कामांसाठी पुणे रेल्वे विभागाने मेगाब्लॉक जाहीर केला आहे. यामुळे २५ आणि २६ तारखेला पुणे आणि मुंबई दरम्यान अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहे.

Railway megablock:
Railway megablock: (MINT_PRINT)

Pune railway mega block : शिवाजीनगर आणि खडकी स्थानकांदरम्यान विविध तांत्रिक कामांसाठी पुणे रेल्वे विभागाने शनिवार आणि रविवारी मेगा ब्लॉक जाहीर केला आहे. यामुळे पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या गाड्यांसह अनेक गाड्या रद्द करण्यात आला आहे. डेक्कन क्वीन, सिंहगड एक्सप्रेससह पुणे-मुंबई-पूर इंटरसिटी एक्स्प्रेस आणि मुंबई-कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. या सोबतच पुणे आणि लोणावळा दरम्यान, ४६ लोकल गाड्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे रेल्वे विभागाचे प्रसिद्धी प्रमुख रोहित भिसे यांनी दिली.

ट्रेंडिंग न्यूज

Navi Mumbai Accident : नवी मुंबईत कारचा भीषण अपघात! दुभाजक ओलांडून कार थेट ट्रॉलीखाली घुसली, तीन ठार

पुणे विभागातील प्री-नॉन-इंटरलॉकिंग, नॉन-इंटरलॉकिंग आणि ऑटोमेटेड सिग्नलिंगच्या कामांमुळे ही रद्दीकरणे होत आहेत, असे पुणे रॅल विभागाचे विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक आणि पीआरओ रामदास भिसे यांनी सांगितले.

पुणे रेल्वे विभागावर पुणे - लोनावळा रेल्वे मार्गावरील शिवाजीनगर खड़की स्थानका दरम्यान इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग आणि स्वयंचलित सिग्नलिंग प्रणाली बसवण्यासाठी विविध तांत्रिक कामांसाठी ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुले शनिवारी (दि २५) आणि रविवारी (दि २६) पुणे मुंबई दरम्यान काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर काही गाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत तर काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आल्याने काही गाड्या उशिराने धावणार आहेत.

Madras high court : बलात्कार पीडितेची 'टू फिंगर टेस्ट' करणारे डॉक्टर ठरणार दोषी; मद्रास हायकोर्टाचा निर्णय

रद्द करण्यात आलेल्या गाड्या

शनिवारी (दि २४) सकाळी सुटणारी १२१२३ मुंबई - पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेस आणि ११००९ मुंबई- पुणे सिंहगड एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.

रविवारी (दि २६) पुणे- तळेगाव -लोनावला -पुणे दरम्यान धावणाऱ्या अप आणि डाउन सर्व ४६ लोकल गाड्या रद्द राहतील.रविवारी (दि २६) सुटणारी १२१२४ पुणे - मुंबई डेक्कन क्वीन एक्सप्रेस तर ११०१० पुणे -मुंबई सिंहगड एक्सप्रेस, पुणे - मुंबई - पुणे डेक्कन एक्सप्रेस, पुणे - मुंबई- पुणे इंटरसिटी एक्सप्रेस तसेच मुंबई - कोल्हापूर- मुंबई कोयना एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहे. तर रविवार असणारी पुणे - जयपुर एक्सप्रेसची पुण्यातून सुटणारी वेळ बदलण्यात आली आहे. ही गाडी ५.३० एवजी दोन तास उशिराने म्हणजेच ७.३० वाजता सुटेल.

तर रविवारी (दि २६) सुटणारी पुणे - मुंबई एक्सप्रेस ६.३५ एवजी पंचवीस मिनिटे उशिराने म्हणजेच ७ वाजता सुटणार आहे. तर रविवारी असणारी पुणे - एर्नाकुलम एक्सप्रेस ही ६.४५ ऐवजी एक तास विलंबाने ७.४५ ला सुटेल. रविवारी दौंड येथून सुटणारी दौंड - इंदौर एक्सप्रेस दुपारी २ ऐवजी चार तास उशिराने संध्याकाळी ६ वाजता सुटेल. शनिवारी त्रिवेंद्रम येथून सुटणारी त्रिवेंद्रम - मुंबई एक्सप्रेस त्रिवेंद्रम येथून तिची निर्धारित वेळ ४.२५ एवजी दोन तास उशिराने म्हणजेच ६.२५ वाजता सुटेल. शनिवारी ग्वालियर येथून सुटणारी ग्वालियर - दौंड एक्सप्रेस ग्वालियर येथून तिच्या ५.१५ एवजी दिड तास उशिराने म्हणजेच ६.४५ वाजता सुटेल.

उशीराने धावणाऱ्या गाड्या

शनिवारी बेंगलुरु येथून सुटणारी गाड़ी बेंगलुरु - मुंबई उद्यान एक्सप्रेस, बेंगलुरु येथून सुटणारी बेंगलुरु - गांधीधाम एक्सप्रेस आणि रविवार मुंबई येथून सुटणारी छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- चेन्नई एक्सप्रेस , लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणारी लोकमान्य टिळक टर्मिनस - काकीनाडा एक्सप्रेस, मुंबई येथून सुटणारी छत्रपति शिवाजी टर्मिनस मुंबई -भुवनेश्वर कोणार्क एक्स्प्रेस आणि मुंबई येथून सुटणारी छत्रपति शिवाजी टर्मिनस मुंबई- हैदराबाद एक्सप्रेस उशिराने धावणार आहेत.

IPL_Entry_Point

विभाग