मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Navi Mumbai Accident : नवी मुंबईत कारचा भीषण अपघात! दुभाजक ओलांडून कार थेट ट्रॉलीखाली घुसली, तीन ठार

Navi Mumbai Accident : नवी मुंबईत कारचा भीषण अपघात! दुभाजक ओलांडून कार थेट ट्रॉलीखाली घुसली, तीन ठार

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Nov 24, 2023 02:57 PM IST

Navi Mumbai Accident : नवी मुंबईत गुरुवारी रात्री भीषण अपघात झाला. एक भरधाव वेगातील कार दुभाजक ओलांडून थेट ट्रॉलीखाली घुसून झालेल्या अपघातात तीन जण ठार झाले.

Navi Mumbai Accident
Navi Mumbai Accident

Navi Mumbai Accident : मुंबईत काल आपघाताच्या दोन भीषण दुर्घटना घडल्या. दुपारी मुंबई अहमदाबाद मार्गावर झालेला भीषण अपघातात पुण्यातील तिघे ठार झाले. ही घटना ताजी असतांना नवी मुंबईत नेरूळ येथे गुरुवारी रात्री पुन्हा भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेली एक कार रस्तादुभाजक ओलांडून थेट पलीकडच्या बाजूला उभ्या असलेल्या एका कंटेनरच्या ट्रॉलीच्या खाली घुसली. या घटनेत देखील तिघांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की यात कारचा चक्काचूर झाला. या आपघाटाचा व्हिडिओ पीटीआयने ट्विटरवर शेअर केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मुंबईत एक पांढऱ्या रंगाची कार भरधाव वेगात जात होती. यावेळी कार वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही कार थेट दुभाजक तोडून दुसऱ्या बाजूला असलेल्या कंटेनरच्या ट्रॉली खली घुसली. पीटीआयनं पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये अपघाताची भीषणता दिसून येत आहे. कारचा चक्काचूर झाला आहे. एमएच ४३ बीई ५८७२ असे अपघात झालेल्या कारचा क्रमांक आहे.

या कारचा पुढचा भाग पूर्णपणे ट्रॉलीच्या खाली घुसला आहे. या अपघात तिघांचा मृत्यू झाला आहे. मृत व्यक्तींची नावे अद्याप समजू शकलेली नाही. अपघातानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात नागरीक जमा झाले. त्यांनी जखमींना कारच्या बाहेर काढले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या आपघातानंतर या मार्गतावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी या ठिकाणी येत येथील वाहतूक सुरुळीत केली.

IPL_Entry_Point

विभाग