मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Railway mega block : महत्त्वाची बातमी! पुणे-लोणावळा मार्गावर उद्या रेल्वेचा मेगाब्लॉक; अनेक गाड्या रद्द

Railway mega block : महत्त्वाची बातमी! पुणे-लोणावळा मार्गावर उद्या रेल्वेचा मेगाब्लॉक; अनेक गाड्या रद्द

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 06, 2024 01:12 PM IST

Pune lonavla Railway mega block : मध्य रेल्वेच्या पुणे विभागाद्वारे पुणे ते लोणावळा दरम्यान अभियांत्रिकी आणि दुरुस्तीच्या तांत्रिक कामांकरीता उद्या रविवारी (दि ७) मेगाब्लॉक घेण्यात येणार असून या दरम्यान, पुणे लोणावळा दरम्यान, अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Pune lonavla railway Mega Block
Pune lonavla railway Mega Block

Pune lonavla Railway mega block : पुणे-लोणावळा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. जर तुम्ही उद्या या मार्गाने प्रवास करणार असाल तर रेल्वेचे वेळापत्रक पाहून बाहेर पडा. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाद्वारे पुणे ते लोणावळा दरम्यान अभियांत्रिकी आणि दुरुस्तीच्या तांत्रिक कामांकरीता रविवारी (दि ७) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे – लोणावळादरम्यान अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या बदलांची दखल घेऊन प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

भयंकर! एकतर्फी प्रेमातून मामे भावाकडून छळ! कंटाळलेल्या तरुणीने घरी बोलवून जिवंत जाळलं

अप उपनगरीय गाड्या रद्द :

- पुण्याहून लोणावळा साठी ०९.५७ वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५६२ रद्द राहील.

- पुण्याहून लोणावळा साठी ११.१७ वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५६४ रद्द राहील.

- पुण्याहून लोणावळासाठी ३ वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५६६ 566 रद्द राहील.

- शिवाजीनगरहून तळेगाव करीता ३.४७ वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५८८ रद्द राहील.

- पुण्याहून लोणावळासाठी ४. २६ वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५६८ रद्द राहील.

- शिवाजीनगर वरून लोणावळा करीता ५.२० वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५७० रद्द राहील.

Sunil Kamble : पोलिसावर हात उचलणं भाजप आमदार सुनील कांबळेंना भोवलं! गुन्हा दाखल

डाऊन उपनगरीय गाड्या रद्द :-

- लोणावळ्याहून शिवाजीनगर करीता १०.५ वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५५९ रद्द राहील.

- लोणावळ्याहून पुण्यासाठी १४.५० वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५६१ रद्द राहील.

- तळेगाव येथून पुण्यासाठी जाणारी ४.४० वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५८९ रद्द राहील.

- लोणावळ्याहून शिवाजीनगर करीता ५.३० वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५६५ रद्द राहील.

- लोणावळ्याहून शिवाजीनगरसाठी ६.८ वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५६७ रद्द राहील.

- लोणावळ्याहून पुण्यासाठी ७ वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५६९ रद्द राहील.

मेल/एक्सप्रेस ट्रेनचे रेग्युलेशन:-

याचबरोबर एमजीआर चेन्नई – लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस ३.३० तास उशिराने धावणार आहे. हा मेगा ब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे. या ब्लॉकमुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल प्रवाशांनी सहकार्य करावे, असे रेल्वे प्रशासनाने केले आहे.

WhatsApp channel