मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sonya Tapkir Murder : मित्राची वाढती प्रतिष्ठा सलत असल्याने काढला काटा; सोन्या तापकीरच्या खुनाचा उलगडा

Sonya Tapkir Murder : मित्राची वाढती प्रतिष्ठा सलत असल्याने काढला काटा; सोन्या तापकीरच्या खुनाचा उलगडा

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
May 23, 2023 01:04 PM IST

Sonya Tapkir Murder : पिंपरी चिंचवडमधील चिखली भागातील मंदिराजवळ सोमवारी झालेल्या कृष्णा उर्फ सोन्या हरिभाऊ तापकीर (वय २० वर्ष) याचा गोळीबार करून खून करण्यात आला होता. त्याच्या खुनाचा उलगडा झाला असून मित्रानेच त्याची हत्या केल्याचे उघड झाले आहे.

इनसेटमध्ये मृत सोन्या तापकीर
इनसेटमध्ये मृत सोन्या तापकीर

पिंपरी: पिंपरी चिंचवड परिसरातील चिखली येथे सोमवारी दुपारच्या सुमारास गोळीबार करून सोन्या हरिभाऊ तापकीर नामक तरुणाचा खून करण्यात आल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान, या प्रकरणी मोठा उलगडा झाला आहे. सोन्याच्या जवळच्या मित्रानेच त्याचा खून केल्याची माहिती पुढे आली आहे. सोन्या तापकीरची वाढती प्रतिष्ठेमुळे त्याची हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

पिंपरी चिंचवडमधील चिखली भागातील मंदिराजवळ कृष्णा उर्फ सोन्या हरिभाऊ तापकीर (वय २०) याचा भरदुपारी गोळीबार करून खून करण्यात आला होता. या प्रकरणी सौरभ उर्फ सोन्या पानसरे (रा. मोई, खेड), त्याचा साथीदार सिद्धार्थ कांबळे असल्याचे तपासात पुढे आल्याने त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सोन्याचे मामा राजेंद्र कैलास कार्ले (रा.३८, रा.चांदुस, ता.खेड) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

खून केल्यानंतर हल्लेखोर फरार झाले होते. पोलिसांची पथके त्यांच्या शोधासाठी रवाना झाली आहेत. दरम्यान, तपासात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. सोन्याची परिसरातील वाढती प्रतिष्ठा सलत असल्याने त्याचा खून करण्यात आला. सोन्या तापकीर याचा दुग्धव्यवसाय असून सोन्या आणि आरोपी सौरभ हे दोघे चांगले मित्र होते. मात्र, गेल्या वर्षी नवरात्रात दांडियामध्ये त्यांच्यात वाद झाले होते.

या सोबतच सोन्याची चिखली परिसरात प्रतिष्ठा वाढत होती. याचा राग सौरभ याला होता. यामुळे त्याने सोन्याचा गेम करण्याचा प्लॅन रचला. सोमवारी दुपारी सोन्या चिखली येथील स्वागत कमानीसमोर थांबला असताना दुचाकीवरून सौरभ हा सिद्धार्थसह त्याच्याजवळ आला. त्यांनी पिस्तुलातून सोन्यावर दोन गोळ्या झाडल्या. यात गंभीर जखमी झाल्याने सोन्याचा मृत्यू झाला.

IPL_Entry_Point

विभाग