मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Police attack : पुण्यात निवृत्त पोलीस निरीक्षकावर जीवघेणा हल्ला; दगडाने ठेचून मारण्याचा प्रयत्न, प्रकृती चिंताजनक

Pune Police attack : पुण्यात निवृत्त पोलीस निरीक्षकावर जीवघेणा हल्ला; दगडाने ठेचून मारण्याचा प्रयत्न, प्रकृती चिंताजनक

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Dec 23, 2023 03:44 PM IST

Pune wanwadi Police Beaten : पुण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका निवृत पोलिसाला निर्जन स्थळी गाठून त्याला दगडाने मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Pune crime news
Pune crime news

Pune Police Beaten: पुण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. काही दिवसांपूर्वीच नोकरीतून निवृत्त झालेल्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाला एकाने निर्जन स्थळी गाठून गंभीर मारहाण केली. यात पोलिस निरीक्षक हा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री ८.३० च्या सुमारास घडली. हल्लेखोरांनी दगडाने मारहाण करून नंतर पळ काढला.

ट्रेंडिंग न्यूज

khambatki ghat : गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांमुळे खांबाटकी घाटात वाहतूक कोंडी; इंजिन गरम झाल्याने अनेक गाड्या बंद पडल्या

निवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक वजीर हुसेन शेख असे या जीवघेणा हल्ला झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेत शेख हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या महितीनुसर वजीर हुसेन शेख हे काही दिवसांपूर्वीच वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून नोकरीतून निवृत्त झाले. शेख हे कोंढवा परिसरात राहायला आहेत.

Traffic news : सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर कोंडीची शक्यता; अवजड वाहनांनी 'ही' वेळ टाळावी!

शुक्रवारी रात्री ८.३० च्या सुमारास हुसेन शेख हे बाहेर गेले असता त्यांना काहींनी निर्जन स्थळी गाठून त्यांना दगडाने अमानुष मारहाण केली. या मारहाणीत शेख हे गंभीर जखमी झाले आहे. त्यांना तातडीने वानवडी येथील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनीच शेख यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. हा हल्ला नेमका कुणी केला याबाबत अद्याप माहिती समोर आली नाही. दरम्यान, जुन्या वादातून हा हल्ला करण्यात आला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. एका निवृत्त पोलिसांवर हा हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

IPL_Entry_Point

विभाग