मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Uddhav Thackeray : कसब्यात भाजप का हरला?; उद्धव ठाकरे यांनी मोजक्या शब्दांत सांगितलं!

Uddhav Thackeray : कसब्यात भाजप का हरला?; उद्धव ठाकरे यांनी मोजक्या शब्दांत सांगितलं!

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Mar 02, 2023 04:43 PM IST

Uddhav Thackeray on Kasba bypoll Result : पुण्यातील पोटनिवडणुकीच्या निकालावर उद्धव ठाकरे यांनी मार्मिक प्रतिक्रिया दिली आहे.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

Uddhav Thackeray on Pune bypoll Result : पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीच्या गोटात जल्लोषाचं वातावरण आहे. तब्बल तीन दशकं भाजपकडं असलेला हा मतदारसंघ महाविकास आघाडीनं खेचून घेतला आहे. भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. ही संधी साधून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर अत्यंत बोचऱ्या शब्दांत हल्ला चढवला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

पुण्यातील पोटनिवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी 'मातोश्री' निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर प्रतिक्रिया दिली. भाजपचा पराभव का झाला याचं त्यांनी मोजक्या शब्दांत विश्लेषण केलं. ‘वापरा आणि फेका’ या नीतीमुळं लोकांनी भाजपचा पराभव केला आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

‘वापरा आणि फेका नीती’ भाजप सर्वत्र वापरतोय. जोपर्यंत शिवसेनेची गरज होती, तोपर्यंत त्यांनी शिवसेनेचा वापर केला. अकाली दल, ममता, समता, जयललिता यांच्या बाबतीतही त्यांनी हेच केलं आहे. कसब्यात टिळकाच्या घराण्याबरोबरही त्यांनी हेच केलं आहे. त्यांचा वापर करून त्यांना बाजूला केलं गेलं. तोही राग लोकांच्या मनात होता. गिरीश बापट यांची तब्येत ठीक नसताना त्यांना प्रचारात आणलं गेलं. मनोहर पर्रिकर यांनाही अशाच प्रकारे नाकात नळ्या असताना प्रचारात आणलं होतं. त्यानंतर त्यांच्या मुलाला बाजूला केलं. ही वृत्ती लोकांना आवडत नाही. सिलेक्टिव्ह सहानुभूती मतदार स्वीकारत नाहीत,' अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

भाजपविरोधी मतं एकत्र करणं हे आव्हान

चिंचवड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या राहुल कलाटे यांनी केलेल्या बंडखोरीवर थेट बोलणं उद्धव ठाकरे यांनी टाळलं. 'भाजपच्या विरोधातील मतांची संख्या वाढतेय. ही मतं एकत्र करणं हे आव्हान आहे. चिंचवडमध्ये दोन उमेदवारांची संख्या एकत्र धरली तर तिथं भाजपच्या विरोधात निकाल लागला असंच म्हणावं लागेल. त्यामुळंच येत्या काळात आम्हाला विरोधी मतांची बेरीज करावी लागेल, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

 

IPL_Entry_Point

विभाग