मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  tushar hambir: हिंदूराष्ट्र संघटनेच्या अध्यक्षावर ससून रुग्णालयात हल्ल्याचा प्रयत्न, पोलीस जखमी

tushar hambir: हिंदूराष्ट्र संघटनेच्या अध्यक्षावर ससून रुग्णालयात हल्ल्याचा प्रयत्न, पोलीस जखमी

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Sep 06, 2022 10:44 AM IST

Tushar Hambir: मोक्कांतर्गत येरवडा कारागृहात असणाऱ्या तुषार हंबीरवर ससून रुग्णालायत उपचार सुरू असतानाच हल्ल्याचा प्रयत्न झाला. यावेळी तिथे असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याने हल्लेखोरांना रोखले.

तुषार हंबीर
तुषार हंबीर

Tushar Hambir: पुण्यात सोमवारी रात्री एकावर ससून रुग्णालयात कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी पोलिसांनी प्रसंगावधान राखत हल्लेखोरांना रोखले. यामध्ये पोलिस कर्मचारी जखमी झाला आहे. मोका गुन्हा दाखल असलेला आणि हिंदू राष्ट्र सेनेच्या तुषार हंबीर याच्यावर हल्ला करण्यासाठी चौघे जण आले होते.

ट्रेंडिंग न्यूज

याबाबत मिळालेली माहिती असी की, तुषार हंबीर याच्यावर खूनासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल असलेला तुषार हंबीर हा येरवडा कारागृहात आहे. पण आजारी असल्यानं २५ ऑगस्टपासून ससून रुग्णालयात तो उपचार घेत आहे. सोमवारी रात्री पावणे दहा वाजता चार जणांनी कोयत्याने त्याच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र तिथे असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांनी हल्लेखोरांना रोकण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या झटापटीत पोलिस कर्मचारी जखमी झाला आहे.

ससून रुग्णालयात घडलेल्या घटनेची माहिती मिळाताच वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तुषार हंबीरवर हल्ला करण्यासाठी आलेले हल्लेखोर फरार झाले आहेत. आता पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, ससून रुग्णालयात प्रवेश करताना चौकशी केली जाते, तरीही शस्त्रे घेऊन हल्लेखोर आत कसे गेलो असा प्रश्न विचारला जात आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग