मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पालघर : प्रियकरासोबत फिरणाऱ्या मुलीला पोलीस असल्याचे सांगून दोन जणांचा जंगलात नेऊन बलात्कार

पालघर : प्रियकरासोबत फिरणाऱ्या मुलीला पोलीस असल्याचे सांगून दोन जणांचा जंगलात नेऊन बलात्कार

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 28, 2023 09:36 PM IST

पोलीस असल्याचे सांगून दोन नराधम अल्पवयीन मुलीला जंगलात घेऊन गेले व तेथे तिच्यावर बलात्कार केला. आरोपींनी तिचा व्हिडिओ बनवून याची वाच्याता कुठे केल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पालघर जिल्ह्यात खळबळजनक घटना समोर आली आहे. २ नराधमांनी स्वत: पोलीस असल्याचे सांगून १७ वर्षीय मुलीवर जंगलात नेऊन बलात्कार केला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही घटना शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. 

ट्रेंडिंग न्यूज

पोलिसांनी सांगितले की, अल्पवयीन मुलगी कल्याण तालुक्यातील डोंबिवली शहरातील एका छोट्या नदीजवळ आपल्या प्रियकरासोबत फिरत होती. त्यावेळी दोन आरोपी तिच्याजवळ आले व स्वत: पोलीस असल्याचे सांगू लागले. त्यांनी प्रेमीयुगुलाला धमकावले व तेथे फिरण्यास मनाई केली. 

त्यानंतर दोन्ही आरोपी मुलीला जवळच्या जंगलात घेऊन गेले व तेथे तिच्यावर बलात्कार केला. त्यावेळी त्यांनी बलात्कार करतानाचा व्हिडिओ बनवला व या प्रकरणाची तक्रार केल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक पीएम भालेराव  यांनी सांगितले की, भारतीय दंड संहिता, लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण अधिनियम आणि माहिती व तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित कलमांच्या आधारे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. 

अल्पवयीन सावत्र मुलीवर बलात्कार करणाऱ्या व्यक्तीला शिक्षा –

दुसरीकडे मुंबईतील विशेष पॉक्सो न्यायालयाने एका व्यक्तिला आपल्याच सावत्र अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी १० वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. पीडिता गर्भवती राहिली होती. 

मुलीने न्यायालयाला सांगितले की, सावत्र वडिलांनी २०१६ पासून तिच्यावर वारंवार बलात्कार केला व कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यावेळी ती १६ वर्षांची होती. सरकारी वकील वीना शेलार यांनी सांगितले की, डीएनए रिपोर्ट, पीड़िता व तिच्या आईसह ९ साक्षीदारांच्या जबाबानंतर दोषीला शिक्षा सुनावण्यात आली. 

IPL_Entry_Point