मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Corona Cases : विदेशातून आलेले नऊ प्रवासी कोरोनाबाधित; मुंबई विमानतळावर खळबळ

Corona Cases : विदेशातून आलेले नऊ प्रवासी कोरोनाबाधित; मुंबई विमानतळावर खळबळ

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 07, 2023 07:09 AM IST

New Corona Cases In Mumbai : सर्वजण विदेशातून मुंबई विमानतळावर आले होते. त्यावेळी प्रशासनाकडून त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली, त्यावेळी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं.

mumbai fresh corona cases today
mumbai fresh corona cases today (HT)

mumbai fresh corona cases today : कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने चीन आणि अमेरिकेत धुमाकूळ घातलेला असतानाच आता या व्हेरियंटचे रुग्ण भारतातही सापडायला लागले आहेत. कारण आता विदेशातून मुंबई विमानतळावर आलेल्या तब्बल नऊ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळं मुंबईत खळबळ उडाली असून या कोरोनाबाधित सर्व लोकांना विलिगीकरणात ठेवण्याचा निर्णय प्रशासानं घेतला आहे. त्यामुळं आता मुंबईत कोरोनाबाबत आणखी कडक पावलं उचलली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून मुंबई विमानतळावर विदेशातून येणाऱ्या प्रवाशांची थर्मल स्क्रिनिंग करण्यात येत आहे. संध्याकाळी मुंबई विमानतळावर मॉरिशस ,लंडन, दोहा ,इजिप्त, मस्कत व्हिएतनाम आणि सौदी अरेबिया या देशातून आलेल्या नऊ प्रवाशांना कोरानाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. याशिवाय यापैकी दोन प्रवाशांना BQ.1.1 या कोरोनाचा सब व्हेरियंटचीबी बाधा झालेली आहे. या सर्व रुग्णांची प्राथमिक चाचणी केल्यानं त्यांच्या रक्ताचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यामुळं आता कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे रुग्ण सापडल्यानं मुंबईत खबरदारी घेतली जात आहे.

केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या निर्देशानुसार, मुंबई विमानतळावर गेल्या १५ दिवसांपासून परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर कोरोना चाचणी केली जात आहे. ३१ डिसेंबरपर्यंत चार लोकांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता एकाचवेळी तब्बल नऊ लोकांना कोरोनाची लागण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर आता सर्वांच्याच चिंता वाढल्या आहेत. चीन, अमेरिका आणि युरोपमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत असल्यानं आता भारतातही आरोग्य विभागानं नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.

IPL_Entry_Point