मराठी बातम्या  /  Maharashtra  /  Maharashtra News 07 January 2023 Live Updates Marathi Breaking News

Marathi News Live Updates(HT)

Marathi News 07 January 2023 Live : अपघाताची चौकशी झाल्यास सत्य बाहेर येईल- आमदार योगेश कदम

Marathi News Live Updates : अपघात झाल्यानंतर ट्रकचालक फरार झाला असून या प्रकरणाची चौकशी झाल्यास सत्य बाहेर येईल, असं वक्तव्य आमदार योगेश कदम यांनी केलं आहे.

Sat, 07 Jan 202307:09 AM IST

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी अपघाताची चौकशी करावी; आमदार योगेश कदमांची मागणी

शुक्रवारी संध्याकाळी मुंबईच्या दिशेनं जात असताना शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या कारला अवजड वाहनानं धडक दिली होती. त्यात चार जणांना किरकोळ मार लागला होता. परंतु आता या अपघाताबाबत आमदार कदम यांनी घातपाताची शक्यता व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे चौकशीची मागणी केली आहे. अपघात झाल्यानंतर ट्रकचालक फरार झाला असून या प्रकरणाची चौकशी झाल्यास सत्य बाहेर येईल, असं वक्तव्य आमदार योगेश कदम यांनी केलं आहे.

Sat, 07 Jan 202304:13 AM IST

माजी क्रिकेटपटू कुमार संगकारा हिवतापामुळं त्रस्त; पुण्यातील रुग्णालयात केला उपचार

भारत आणि श्रीलंकेत सुरू असलेल्या मालिकेसाठी पुण्यात आलेला श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू कुमार संगकाराला थंडी, ताप आणि डिहायड्रेशनच्या समस्येमुळं पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्याचा उपचार पूर्ण केल्यानंतर डॉक्टरांनी संगकाराला डिस्चार्ज दिला आहे.

Sat, 07 Jan 202301:06 AM IST

Sheezan Khan : अभिनेता शिजान खानच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

Tunisha Sharma Suicide Case : अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणात अटक करण्यात आल्यानंतर आज शिजान खानच्या जामीन अर्जावर न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यासाठी शिजानला कारागृहातून कोर्टात हजर केलं जाणार आहे. त्यामुळं आता कोर्ट काय निर्णय देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

Sat, 07 Jan 202301:04 AM IST

Konkan : ठाकरे-शिंदे गटाचे नेते कोकणात आज एकाच मंचावर; राजकीय फटकेबाजीची शक्यता

Thackeray vs Shinde : सुतार समाजाच्या मेळाव्यासाठी आज ठाकरे आणि शिंदे गटाचे नेते रत्नागिरीतील चिपळूणमध्ये एकत्र येणार आहेत. स्थानिक आमदार आणि शिवसेनेचे नेते भास्कर जाधव, खासदार विनायक राऊत, राजन साळवी, शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत आणि आमदार योगेश कदम हे नेते आज एकाच व्यासपीठावर येणार असल्यानं जोरदार राजकीय फटकेबाजी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.