Navi Mumbai Builder Murder : नवी मुंबई हादरली! सीवूड्स परिसरात बांधकाम व्यावसायिकाची गोळ्या झाडून हत्या-navi mumbai construction businessman manoj singh was shot dead in seawoods navi mumbai case has been registered ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Navi Mumbai Builder Murder : नवी मुंबई हादरली! सीवूड्स परिसरात बांधकाम व्यावसायिकाची गोळ्या झाडून हत्या

Navi Mumbai Builder Murder : नवी मुंबई हादरली! सीवूड्स परिसरात बांधकाम व्यावसायिकाची गोळ्या झाडून हत्या

Jan 14, 2024 11:30 AM IST

Navi Mumbai firing news : नवी मुंबईत उलवे परिसरात एका बांधकाम व्यावसायिकाची थेट त्याच्या कार्यालयात जाऊन हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

Navi Mumbai builder murder
Navi Mumbai builder murder

Navi Mumbai builder murder : नवी मुंबईत गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. शनिवारी (दि १३) उलवे येथील सीवूड सेक्टर ४४ मधील एका बिल्डरच्या कार्यालयात घुसून काही हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडून त्याची हत्या केली. डोक्यात गोळी लागल्याने बिल्डरचा जागेवरच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मनोज सिंह (वय ३९) असे हत्या करण्यात आलेल्या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे. काही हल्लेखोर शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास त्यांच्या कारीलयात घुसले. आणि त्यांनी गोळीबार करत सिंह यांचा खून केला.

Milind Deora News : मोठी बातमी! मिलिंद देवरा यांनी काँग्रेसचा ‘हात’ सोडला! आज शिंदे गटात करणार प्रवेश

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मनोज सिंह हे या भागातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांचे नवी मुंबईच्या उलवे भागात सीवूड सेक्टर ४४ मध्ये त्यांचे कार्यालय आहे. शनिवारी ते सकाळी त्यांच्या कार्यालयात गेले होते. यावेळी काही हल्लेखोर त्यांच्या कार्यालयात घुसले. सिंह हे त्यांच्या चेंबरमध्ये असतांना आरोपींनी तयांच्यावर गोळ्या झाडल्या. यातील एक गोली ही सिंह यांच्या डोक्यात लागल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.

Maharashtra Weather Update : उत्तर भारत गारठला! तापमानात ३ अंश सेल्सिअवर; महाराष्ट्रात 'या' भागात थंडी वाढणार

यानंतर हल्लेखोर पसार झाले. दरम्यान, त्यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या दोन मुली या कार्यालयात आल्यावर सिंह हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिस घटनास्थळी येत पंचनामा केला असून आरोपींना पडकण्यासाठी पथकांची स्थानपणा करण्यात अलायी आहे. दरम्यान, एखाद्या जवळच्याच व्यक्तीनं बांधकाम व्यावसायिक मनोज सिंह यांची हत्या केल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.

पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून मारेकऱ्याचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, बांधकाम व्यावसायिक मनोज सिंह यांच्यावर फसवणूक केल्याचे तीन गुन्हे आधीपासूनच दाखल करण्यात आले आहेत.

विभाग