मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Milind Deora News : मोठी बातमी! मिलिंद देवरा यांनी काँग्रेसचा ‘हात’ सोडला! आज शिंदे गटात करणार प्रवेश

Milind Deora News : मोठी बातमी! मिलिंद देवरा यांनी काँग्रेसचा ‘हात’ सोडला! आज शिंदे गटात करणार प्रवेश

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 14, 2024 10:14 AM IST

Milind Deora quits Congress : काँग्रेसनेते मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी ट्विटरवर या बाबत पोस्ट केली आहे. दरम्यान, आज ते शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे.

Milind Deora
Milind Deora

Milind Deora Set To Join Eknath Shinde led Shiv Sena: आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे माजी खासदार मिलिंद देवरा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अखेर देवारा यांनी काँग्रेसला राम राम केला आहे. त्यांनी काँग्रेसच्या सदस्यत्व पदाचा राजीनामा दिला आहे. या बाबत त्यांनी आज सकाळी ट्विटर पोस्ट करून अधिकृत जाहीर केले आहे. दरम्यान, आज ते शिंदे गटात प्रवेश घेण्याची शक्यता आहे.

सध्या जागा वाटपावरून इंडिया आघाडीमध्ये चर्चा सुरू आहे. दरम्यान, अरविंद सावंत हे दक्षिण मुंबई मतदार संघातून दोनदा निवडून आले होते. त्यांनी मिलिंद देवरा यांचा पराभव देखील केला आहे. अरविंद सावंत हे दोन वेळा निवडून आल्याने उद्धव ठाकरे हे त्यांच्या महाविकास आघाडीतील मित्रपक्ष काँग्रेसला ही जागा देण्यास तयार नाहीत. कोणत्याही परिस्थितीत प्रतिष्ठेची जागा इतर कोणत्याही पक्षाला दिली जाणार नाही, असे सावंत यांनी शनिवारी स्पष्ट केले होते. त्यामुळे मिलिंद देवरा हे अस्वस्त होते.

'आम्हाला धमकावण्याचा परवाना कुणालाही नाही', चीनवरुन येताच मालदीवचे अध्यक्ष मुइझू यांचा भारताला अप्रत्यक्ष इशारा

काँग्रेसचे दिवंगत नेते मुरली देवरा यांचे सुपुत्र मिलिंद देवरा हे शिंदे गटात प्रवेश करतील अशा चर्चा सुरू होत्या. अखेर त्यांनी आज त्यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. देवरा हे तब्बल ५५ वर्ष काँग्रेस सोबत एकनिष्ठ राहिले होते. त्यांनी सर्व कार्यकर्ते आणि इतर सहकार्यांचे आभार देखील मानले आहे. मिलिंद देवरा सलग दोन वेळा (२००४, २००९) या मतदारसंघातून निवडून आले होते. तसेच त्यांचे वडील मुरली देवरा हे चार वेळा दक्षिण मुंबईतून खासदार झाले आहेत.

दरम्यान, देवरा हे जरी शिंदे गटात दाखल होणार असले तरी त्यांना त्यांच्या पक्षाकडून तिकीट मिळेल याची खात्री नाही. भाजप देखील या जागेवर त्यांचा दावा करत असून देवरा यांना राज्यसभेची जागा देऊ केल्याची माहिती आहे.

WhatsApp channel