India Maldives Row : गेल्या काही दिवसांपासून भारत आणि मालदीवमधील संबंध ताणले गेले आहेत. मालदीवच्या तीन मंत्र्यांनी पंतप्रधान मोदी आणि भारताबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्यावर त्यात आणखी भर पडली आहे. मालदीव सरकारने तिन्ही मंत्र्यांना निलंबित करून वाद कमी करण्याचा प्रयत्न केला असला तरी, हा वाद वाढत असल्याचेच चित्र आहे. दरम्यान, मालदिवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू चीन दौऱ्यावरून परतल्यानंतर त्यांचे सुर पालटले आहेत. त्यांनी भारताला धमकी वजा इशारा दिला आहे. मुइजू म्हणले, 'आम्ही लहान असू, पण आम्हाला धमकावण्याचा परवाना मिळत(भारत) नाही, असे त्यांनी भारताचे नाव न घेता म्हटले आहे.
पाच दिवसांच्या चीन दौऱ्यावरून परतल्यानंतर मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांना भारत मालदिव संबंधाबाबत प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देतांना ते म्हणाले की, "आम्ही लहान असू, पण त्यामुळे तुम्हाला आम्हाला धमकावण्याचा परवाना मिळत नाही." मुइज्जूने यांनी यावेळी कोणत्याही देशाचे नाव घेतले नसले तरी भारताबाबत त्यांनी हे वक्तव्य केल्याचे मानले जात आहे. मुज्जू यांचे हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
पंतप्रधान मोदींनी काही दिवसांपूर्वी लक्षद्वीपला भेट दिली होती. त्यांचे तेथील छायाचित्रे देखील समोर आली होती. यानंतर त्यांनी या ठिकाणी भेट देण्याचे भारतीय पर्यटकांना आवाहनही केले होते. दरम्यान, मोदी यांच्या या भेटीवर मालदिवच्या तीन मंत्र्यांनी आक्षेपार्ह विधान केले होते. तेव्हापासून सोशल मीडियावर बॉयकॉट मालदिव हा ट्रेड भारतात सुरू झाला होता. अनेक भातीयांनी त्यांचा मालदिव दौरा या नंतर रद्द देखील केला होता. तर काही कंपन्यांनी मालदवीचे विमान प्रवास देखील रद्द केला होता. मालदीवच्या तीन मंत्र्यांनी पीएम मोदींबद्दल अपमानजनक टिप्पणी केली होती, ज्याचा भारताने तीव्र निषेध व्यक्त केला होता. यानंटर मालदीव सरकारने मलशा शरीफ, मरियम शिउना आणि अब्दुल्ला महजूम मजीद या तीन मंत्र्यांना तडकाफडकी निलंबित केले. त्यांनी केलेले व्यक्तव्य हे वैयक्तिक म्हणून संबोधित केले होते.
मालदीवचे माजी राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलिह यांनीही भारताविरोधात द्वेषपूर्ण भाषा वापरल्याचा निषेध केला. भारत हा मालदीवचा नेहमीच चांगला मित्र आहे आणि आम्ही अशा बेजबाबदार टिप्पण्यांमुळे आमच्या दोन्ही देशांमधील जुन्या मैत्रीवर नकारात्मक परिणाम होऊ देऊ नये," असे सोलिह यांनी ट्विटरवर एका पोस्टमध्ये म्हटले होते. केवळ मालदीव सरकारच नाही तर तिथल्या अनेक विरोधी नेत्यांनीही या प्रकरणी गंभीर कारवाई करण्याची मागणी केली. दरवर्षी मोठ्या संख्येने भारतीय पर्यटक मालदीवला भेट देतात, ज्यामुळे मालदिवच्या पर्यटन उद्योगाला चालना मिळते.
चीन दौऱ्यावर असताना मुइझू यांनी जिनपिंग यांचीही भेट घेतली. भारतासोबतच्या तणावादरम्यान मालदीवचे अध्यक्ष मुइझू हे पाच दिवसांच्या चीन दौऱ्यावर गेले होते. यावेळी त्यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशीही महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या दौऱ्यात मालदीव आणि चीनमध्ये २० महत्त्वाच्या करारांवरही स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. चीन मालदीवचे राष्ट्रीय सार्वभौमत्व, स्वातंत्र्य, प्रादेशिक अखंडता आणि राष्ट्रीय प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी ठामपणे समर्थन करत असल्याचे वक्तव्य केले.
संबंधित बातम्या