मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Navi Mumbai : क्रिकेट खेळण्यावरून वाद पेटला, रागातून तरुणाच्या गळ्यावर कात्रीनं वार; नवी मुंबईतील घटना

Navi Mumbai : क्रिकेट खेळण्यावरून वाद पेटला, रागातून तरुणाच्या गळ्यावर कात्रीनं वार; नवी मुंबईतील घटना

Jan 24, 2024 08:03 PM IST

Airoli Minor Boy Stabs Teenager: या घटनेत संबंधित तरुण जखमी झाला असून त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Navi Mumbai Crime
Navi Mumbai Crime

Navi Mumbai Airoli Crime: क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून तरुणाच्या गळ्यावर कात्रीने वार केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ऐरोलीतील यादव नगरमध्ये ही घटना घडली. या हल्ल्यात संबंधित तरुण जखमी झाला असून त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, क्रिकेट खेळताना अल्पवयीन मुलगा आणि पीडित तरुण यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यानंतर अल्पवयीन मुलाने त्याच्याजवळ असलेली कात्रीने तरुणाच्या गळ्यावर वार केले. या घटनेत तरुण जखमी झाला. त्याला त्वरीत रुग्णालयात दाखल करण्यात आले. या तरुणाची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

याप्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन आरोपीविरोधात भारतीय दंड संहिताच्या इतर कलमांसह कलम ३२४ (स्वैच्छिकपणे धोकादायक शस्त्रे आणि साधनांनी दुखापत करणे), ३२३ (स्वेच्छेने दुखापत करणे), ५०४ (हेतूपूर्वक अपमान) आणि ५०६ (गुन्हेगारी धमकावणे) अंतर्गत आरोपांचा सामना करावा लागत आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. आरोपी अल्पवयीन असल्याने त्याची ओळख लपवण्यात आली आहे.

WhatsApp channel
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर