मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पत्नीला दारूचे व्यसन; पैशासाठी रोजच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या, पुण्यातील घटना

पत्नीला दारूचे व्यसन; पैशासाठी रोजच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या, पुण्यातील घटना

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 23, 2024 05:39 PM IST

Pune News : पत्नीच्या दारूच्या व्यसनाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याचा खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी पत्नीला अटक करण्यात आली आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पिंपरी चिंचवडमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. आतापर्यंत तुम्ही पतीच्या दारूच्या व्यसनाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याच्या घटना ऐकल्या असतील. मात्र पिंपरी चिंचवडमध्ये पत्नीच्या दारुच्या व्यसनाला व वारंवार पैसे मागण्याला कंटाळून पतीनेच विष पिऊन आपले जीवन संपवले आहे. देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी पत्नी आणि तिच्या बहिणीला अटक केली आहे.  

नारायण मधुकर निर्वळ (वय ३५), असे आत्महत्या केलेल्याचे पतीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नारायण यांची पत्नी दारू पिण्यासाठी पतीकडे वारंवार पैशांची मागणी करत असे. पैशासाठी पत्नी व तिची बहीण त्याचा छळ करत होते. याला कंटाळून नारायणने आत्महत्या केली. पोलिसांनी नारायण निर्वळ यांची पत्नी आणि तिची बहीण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून दोघींना अटक केली.

मृत नारायण अॅनिमेशन क्षेत्रात काम करत होते. तसेच त्यांची पत्नीही एका कंपनीत काम करत असून तिचे 'वर्क फ्रॉम होम' सुरू होते. नारायण याची पत्नी व तिची बहीण दोघी त्याच्याकडे पैसे मागत होत्या. त्यांना दारूचे व्यसन होते. आपल्या व्यसनापायी ते नारायणकडे वारंवार पैसाचा तगादा लावत होते. यावरून दोघांमध्ये नेहमी वाद होत होते. नेहमीच्या त्रासाला व भांडणाला कंटाळून नारायणने राहत्या घरी विष पिऊन आत्महत्या केली.

आत्महत्येपूर्वी नारायणने आपला भाऊ ज्ञानेश्वर निर्वळ यांना फोन करून पत्नीकडून होणाऱ्या त्रासाची माहिती दिली होती. त्यावरून ज्ञानेश्वर यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. यावरून पोलिसांनी पत्नीविरोधात गुन्हा दाखल करत तिला अटक केली आहे.

WhatsApp channel

विभाग