मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nagpur Flood : नागपुरात हाहाकार.. १० हजार घरात शिरलं पाणी, ३ जणांचा बळी; सरकारकडून मदत जाहीर

Nagpur Flood : नागपुरात हाहाकार.. १० हजार घरात शिरलं पाणी, ३ जणांचा बळी; सरकारकडून मदत जाहीर

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Sep 23, 2023 09:58 PM IST

Nagpur Heavy Rain : नागपूरमधील पूरसदृश्य स्थितीचा आढावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतला. त्यानंतर नुकसानग्रस्तांसाठी सरकारकडून आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली.

पूरपरिस्थिती संदर्भात आढावा बैठक
पूरपरिस्थिती संदर्भात आढावा बैठक

नागपूरमध्ये शनिवारी पहाटे झालेल्या अतिवृष्टीने शहरासह परिसरात मोठा हाहाकार उडाला आहे. नाग नदीला आलेला पुरामुळे काही भागात अचानक पाण्याच्या पातळीत वाढ होऊन अनेक घरांमध्ये पाणी शिरले. रस्त्यावरून नदीसारखे पाणी वाहू लागले.  नागपूरमधील या पूरसदृश्य स्थितीचा आढावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतला. पालिकेच्या मुख्यालयात मनपा आयुक्त,उपायुक्त आणि लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीतही आढावा बैठक पार पडली. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानग्रस्तांसाठी तातडीच्या मदतीची घोषणा केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

नागपुरात मध्यरात्री ४ तासांत तब्बल १०९ मिमी पावसाची नोंद झाली. यातील २ तासात ९० टक्के पाऊस झाला. या पावसामुळे नागपूर जलमय झाले. अनेक भागात पाणी साठले आहे. काही परिसरात तब्बल ६ फुटापर्यंत पाणी साठले होते. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागपुरातील पूर सदृश्य स्थितीबाबत शनिवारी सायंकाळच्या सुमारास आढावा बैठक पार पडली.

पावसामुळे काही ठिकाणी ग्राउंड फ्लोर,बसेस पाण्यात गेल्या. ३ लोकांचा मृत्यू आणि १४ जनावर यात मृत्यू मुखी पडले. भिंती, पुल याचे नुकसान, गाळ चिखल झाल्याने मोठे नुकसान झाल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

या बैठकीनंतर देवेद्र फडणवीसांनी नुकसानग्रस्त दुकानदारांना राज्य सरकारकडून ५० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली.

नागपूरमध्ये १० हजार घरात पाणी शिरले. झोपडपट्टी भागात मोठं नुकसान झाले. अन्न धान्याचं नुकसान झाले, ज्यांच्या घरात पाणी शिरले त्याला तातडीची मदत म्हणून १० हजार रुपये देण्यात येईल. तसंच गाळ काढण्यासाठी मनपा मदत करणार आहे. ज्यांच्यादुकानांचे नुकसान झाले असेल त्यांना ५०,००० हजार आणि छोट्या ठेले दुकानांना १० हजार रुपयांची तातडीची मदत दिली जाणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

 

फडणवीस म्हणाले की, अतिवृष्टीनंतर शहरातील वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. दुर्घटना होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून १४ ट्रान्सफॉर्मार अद्याप बंद ठेवण्यात आले आहेत. ३ तासात ३५० लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.

IPL_Entry_Point