मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  संजय राऊतांची भेट घेतल्यानंतर आमदार भुयार म्हणाले, 'मी मतदानाला गेलो हाच…'

संजय राऊतांची भेट घेतल्यानंतर आमदार भुयार म्हणाले, 'मी मतदानाला गेलो हाच…'

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Jun 13, 2022 09:30 AM IST

राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर संजय राऊतांनी अपक्ष आमदारांनी मत दिले नसल्याचा आरोप केला होता.

शिवसेना खासदार संजय राऊत आणि आमदार देवेंद्र भुयार
शिवसेना खासदार संजय राऊत आणि आमदार देवेंद्र भुयार

राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Election) शिवसेनेचे संजय पवार (Sanjay Pawar) यांचा पराभव झाल्यानंतर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी संताप व्यक्त केला होता. त्यांनी काही आमदारांवर शिवसेनेला मतदान न केल्याचा आरोप केला होता. त्यामध्ये आमदार देवेंद्र भुयार (devendra bhuyar) यांचेही नाव राऊतांनी घेतले होते. दरम्यान, आमदार देवेंद्र भुयार यांनी त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली होती. आता त्यांनी संजय राऊत यांचीही भेट घेतली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर देवेंद्र भुयार यांनी म्हटलं होतं की, " माझे काही प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्यानंतर लोकांना मी शिवसेनेविरोधात आहे असं वाटलं. त्यानंतर शिवसेनेच्या पराभवाचं खापर अपक्ष आमदारांवर आणि माझ्यावरही फोडण्यात आलं. यासंदर्भात मी शरद पवार यांच्याशी बोललो. राऊतांनी हे विधान गैरसमजातून केलं असावं."

संजय राऊत यांची भेट घेतल्यानतंर माध्यमांशी बोलताना देवेंद्र भुयार यांनी गैरसमज दूर झाले असल्याचं सांगितलं. त्यांनी म्हटलं की," मतदान प्रक्रिया पार पडली तेव्हा मी मत दिले नाही अशी चर्चा सुरु होती. मत देताना थोडी गडबड केली. १० जणांना थांबण्यास सांगितले होते. त्यानंतर २ जण थांबले असताना मी मतदानाला गेलो हाच गैरसमज झाला होता. मी, मुख्य प्रतोद आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार मत दिल्याचं राऊतांना भेटीवेळी सांगितले.

मुख्यमंत्री भेटीसाठी वेळ देत नाहीत अशी तक्रार भुयार यांनी केली होती. याबाबत बोलताना भुयार म्हणाले की, मी महाविकास आघाडीचा घटक आहे आणि राहीन. येत्या विधान परिषदेच्या निवडणुकीत याचा परिणाम होणार नाही. मुख्यमंत्री आम्हाला भेटत नाहीत हे खरे आहे. आता शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना अपक्ष आमदारांची भेट २० तारखेआधी घेण्यास सांगितलं आहे. मुख्यमंत्र्यांनी तसं करायला हवं. आम्ही जनतेची कामे सांगतो, वैयक्तिक कामासाठी निधी मागत नाही.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या