Mumbai RailwayMegablock : मुंबईकरांनो आज रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, घराबाहेर पडतांना वेळापत्रक तपासा-megablock on all three lines of the mumbai railway today see details ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai RailwayMegablock : मुंबईकरांनो आज रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, घराबाहेर पडतांना वेळापत्रक तपासा

Mumbai RailwayMegablock : मुंबईकरांनो आज रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, घराबाहेर पडतांना वेळापत्रक तपासा

Jan 14, 2024 06:40 AM IST

Mumbai RailwayMegablock : मुंबईत आज रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. रेल्वे रुळांची दरुस्ती आणि सिग्नल यंत्रणातील बिघाड दुरुस्त करण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे रेल्वेचे वेळापत्रक पाहून घरा बाहेर पाडण्याचे आवाहन रेल्वे प्रशासाने केले आहे.

Mumbai local megablock
Mumbai local megablock

Mumbai Railway megablock : मुंबईकरांनो आज सुट्टीच्या दिवस असला तरी रेल्वेचे वेळापत्रक पाहून बाहेर पाडण्याचे नियोजन करावे लागणार आहे. रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामांसाठी रविवारी तीनही मार्गांवर 'मेगाब्लॉक' घोषित करण्यात आला आहे. हा मेगा ब्लॉक पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रूझ ते गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावर तर जलद मार्गावरील लोकल सेवा सांताक्रुझ ते गोरेगाव स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर वळविण्यात आली आहे. हार्बर मार्गावर वडाळा रोड ते मानखुर्द अप-डाऊन मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मेगब्लॉक राहणार असून मध्य रेल्वेवर ठाणे-कल्याण पाचव्या आणि सहाव्या अप-डाऊन जलद मार्गावर देखील मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे.

iPhone Sale: फ्लिपकार्ट रिपब्लिक डे सेलमध्ये आयफोन १५ अगदी स्वस्तात खरेदी करण्याची संधी!

लोकल सेवा ही मुंबईची लाईफ लाइन आहे. रोज लाखो नागरीक या रेल्वेसेवेच्या लाभ घेत असतात. त्यामुळे प्रवासाची भिस्त सर्व या लोकल सेवेवर असते. दरम्यान, आज विविध कामांसाठी आज मेगाब्लॉक घोषित करण्यात आल्याने, अनेक गाड्या या रद्द करण्यात आल्या आहेत. हा ब्लॉक मध्य मार्गावरील ठाणे- कल्याण दरम्यान घेण्यात येणार असून पाचव्या आणि सहाव्या अप-डाऊन जलद मार्गावर हा ब्लॉक राहणार आहे. दरम्यान, या काळात धीम्या मार्गावरील वाहतूक ही नियमितपणे सुरु राहणार आहे. तर पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवरील मेल-एक्स्प्रेस जलद अप-डाउन मार्गावरून चालवण्यात येणार आहेत. यामुळे मेल-एक्स्प्रेस १५ ते २० मिनिटे उशिरा धावणार आहेत. रात्रकालीन ब्लॉकमुळे सीएसएमटी ते कल्याणदरम्यान कोणताही ब्लॉक असणार नाही.

Mumbai Air Show 2024 : हवाई दलाच्या सूर्यकिरण, सारंग, एरोबॅटिक पथकाच्या हवाई कसरतींनी मुंबईकर शहारले! पाहा फोटो

हार्बर मार्गावर वडाळा रोड ते मानखुर्द अप-डाऊन मार्गावर सकाळी ११ ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉकमुळे वडाळा रोड ते मानखुर्द, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशी/बेलापूर/पनवेल अप-डाउन लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. सीएसएमटी ते गोरेगाव लोकल वेळापत्रकानुसार धावतील तर पनवेल ते मानखुर्ददरम्यान विशेष लोकल चालवण्यात येणार असून ठाणे मार्गाने प्रवाश्यांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

पनवेल ते कुर्ला दरम्यान प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वरुन विशेष लोकल चालवल्या जाणार आहेत. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १० ते संध्याकाळी ६ पर्यंत मेन लाईन आणि पश्चिम मार्गावरुन प्रवास करण्याची परवानगी देण्यात आलीये.

Whats_app_banner