iPhone 15 and iPhone 14 Sale: अॅपल आयफोनच्या ज्या चाहत्यांना या मौल्यवान गॅजेटवर हात ठेवायचा आहे, त्यांना प्रजासत्ताक दिनाच्या सेलअंतर्गत फ्लिपकार्टवर तोंडाला पाणी आणणारी ऑफर मिळत आहे. हा सेल आजपासून सुरु झाला असून येत्या १९ जानेवारीला संपणार आहे. ई-कॉमर्स कंपनीच्या रिपब्लिक डे सेल अंतर्गत आयफोनसह नोकिया, सॅमसंग, लेनोव्हो, पोको आदी इतर कंपन्यांच्या स्मार्टफोनवर विविध ऑफर्स आहेत.
आयफोन १५ गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात ७९ हजार ९०० रुपयांसह लॉन्च झाला होता. परंतु, फ्लिपकार्ट या आयफोनच्या खरेदीवर १७ टक्के सूट देत आहे. त्यामुळे त्याची किंमत ६५ हजार ९९९ रुपयांवर आली. त्यामुळे ग्राहकांना १३ हजार ९०१ रुपये वाचवता येणार आहेत. आयफोनच्या खरेदीवर ग्राहकांना बँक ऑफर्सही दिल्या जात आहेत.
फ्लिपकार्टच्या वेबसाईटनुसार, ग्राहकांना 'बाय विथ एक्सचेंज'चा पर्याय देखील आहे, ज्याअंतर्गत ग्राहकांना आयफोन १५ च्या किंमतीवर ५४ हजार ९९० रुपयांपर्यंत सूट मिळेल. आयफोन १५ पाच रंगांमध्ये उपलब्ध आहे. आयफोन १५ मध्ये १२८ जीबी स्टोरेज मेमरी देण्यात आली आहे. तसेच ६.१ इंच सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले मिळत आहे. याशिवाय, ४८ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा मिळत आहे. सेल्फीसाठी ग्राहकांना १२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळत आहे.
भारतात आयफोन १४ ची किंमत ६९ हजार ९०० रुपये इतकी आहे. दरम्यान, २०२२ मध्ये आयफोन १४ लॉन्च करण्यात आला होता. फ्लिपकार्टवर आयफोन १४ ११ हजार ९०१ रुपये म्हणजेच १७ टक्के डिस्काऊंटसह ५७ हजार ९९९ रुपयांत लिस्ट करण्यात आला. 'बाय विथ एक्स्चेंज' या पर्यायांतर्गत ग्राहकांना या उत्पादनावर ५४ हजार ९९० रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. आयफोनवर बँक ऑफर्सही मिळत आहे. विशेष म्हणजे, एक्सचेंज डिस्काऊंट हा स्मार्टफोन च्या मॉडेल आणि स्थितीवर अवलंबून असेल. त्यामुळे 'बाय विथ एक्स्चेंज' या पर्यायांतर्गत प्रत्यक्ष सवलत वेगवेगळ्या ग्राहकांसाठी वेगवेगळी असेल.
संबंधित बातम्या