मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Amazon Great Republic Day Sale: आयफोनसह अनेक स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची सुवर्णसंधी!

Amazon Great Republic Day Sale: आयफोनसह अनेक स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची सुवर्णसंधी!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 13, 2024 01:18 PM IST

Smartphones Sales: अ‍ॅमेझॉनच्या ग्रेट रिपब्लिक डे सेलदरम्यान अनेक स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. एसबीआय क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना १० टक्के त्वरित सूट मिळते. तर, अ‍ॅमेझॉन पे आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना ५ टक्के कॅशबॅक मिळत आहे.

Iphone
Iphone

Amazon Sale: अ‍ॅमेझॉनचा ग्रेट रिपब्लिक डे सेल आजपासून (१३ जानेवारी २०२४) पासून सुरू होत आहे.  हा सेल मर्यादीत कालावधी साठी असेल.  हा सेल येत्या १७ जानेवारी २०२४ पर्यंत चालणार आहे. एसबीआय क्रेडिट कार्डद्वारे आणि वनप्लस, सॅमसंग, रियलमी, शाओमी, अ‍ॅपल, आयक्यूओओ, ऑनर, मोटोरोला, पोको आणि इतर स्मार्टफोन्सच्या ईएमआय व्यवहारावर १० टक्के सूट मिळत आहे. याशिवाय, प्रीमियम स्मार्टफोनसाठी आकर्षक एक्सचेंज ऑफर्स उपलब्ध आहेत.

अ‍ॅमेझॉन पे आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्डचा वापर करून ग्राहकांना अनलिमिटेड ५ टक्के कॅशबॅक मिळत आहे.  ग्रेट रिपब्लिक डे सेलद्वारे ग्राहकांना ५ हजार रुपयांपर्यंत बक्षीस जिंकण्याची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे.

  • आयफोन १३: या स्मार्टफोनमध्ये ६.१ इंचाचा सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले, १२ एमपी वाइड आणि अल्ट्रा-वाइड कॅमेरासह प्रगत ड्युअल कॅमेरा सिस्टम, 4K डॉल्बी व्हिजन एचडीआर रेकॉर्डिंग आणि नाइट मोडसह १२ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा मिळत आहे.  अ‍ॅमेझॉनवर हा फोन सर्व ऑफर्ससह ४८ हजार ९९९ रुपयांना मिळत आहे. 
  • ऑनर 90 5 जी: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७ जेन १ एक्सलेरेटेड एडिशन 5G ४ एनएम प्रोसेसरसह सुसज्ज आहे. या फोनमध्ये २०० मेगापिक्सेल चा मेन आणि ५० मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. अ‍ॅमेझॉनवर हा फोन सर्व ऑफर्ससह १९ हजार ९९९ रुपयांमध्ये मिळवा. 
  • आयटेल ए७०: हा स्मार्टफोन डायनॅमिक बारसह १२ जीबी रॅम, ६.६ एचडी आयपीएस डिस्प्ले आणि फ्लॅशसह ८ एमपी सेल्फी कॅमेरासह येतो. यात ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. अ‍ॅमेझॉनवर हा फोन बँक ऑफरसह ६ हजार ११९ रुपयांत मिळवा.
  • मोटोरोला रेजर 40 अल्ट्रा: या फ्लिप फोनमध्ये ६.९ इंच एफएचडी+ पीओएलईडी डिस्प्ले एक्सटर्नल डिस्प्ले, ३.६ इंच पीओएलईडी डिस्प्ले, १२ एमपी मेन कॅमेरा आणि १३ एमपी रियर कॅमेरा आहे. अ‍ॅमेझॉनवर बँक ऑफरसह ६९,९९९ रुपयांत खरेदी करा.
  • वनप्लस नॉर्ड सीई 3 लाइट 5 जी : हा 5G स्मार्टफोन ६.७२ इंच डिस्प्ले, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६९५ 5G प्रोसेसर, १०८ मेगापिक्सल मुख्य कॅमेरा, १६ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आणि ६७ वॅट चार्जिंग सपोर्टसह ५ हजार एमएएच क्षमता असलेली बॅटरी मिळत आहे.  बँक ऑफर्स आणि कूपन ऑफरसह हा फोन अमेझॉनवर अवघ्या १७ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येऊ शकतो. 
  • वनप्लस 11 आर 5 जी: हा स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8+ जेन 1 प्रोसेसर, १२० हर्ट्झ सुपर फ्लुइड एमोलेड सह ६.७  इंचडिस्प्ले, ५० मेगापिक्सल मुख्य कॅमेरा, १६ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आणि  ५ हजार एमएएच बॅटरीसह येतो. अ‍ॅमेझॉनवर बँक ऑफरसह ३८ हजार ९९९ रुपयांत खरेदी करा.
  • रेडमी नोट १३ ५ जी: रेडमी स्मार्टफोनमध्ये १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह मीडियाटेक डायमेंसिटी ६०८० प्रोसेसरसह ६.६७ इंचअमोलेड डिस्प्ले आणि मल्टीटास्किंग देण्यात आले आहे. 33 वॉट फास्ट चार्जिंग आणि ५ हजार एमएएच बॅटरी असलेला हा फोन दिवसभर चालण्यास सक्षम आहे. अ‍ॅमेझॉनवर हा फोन बँक ऑफरसह १६ हजार ९९९ रुपयांत मिळवा. 
  • सॅमसंग गॅलेक्सी एस २३ ५ जी: या स्मार्टफोनमध्ये ५० एमपी वाइड अँगल कॅमेरा आणि दमदार चिप देण्यात आली आहे. स्नॅपड्रॅगन ८ जेन २ प्रोसेसरसह संचालित आणि याची किंमत ५४ हजार ९९९ रुपये आणि १० हजार रुपयांची मोठी बँक ऑफर मिळत आहे.

WhatsApp channel

विभाग