मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Kharadi Crime News : कौटुंबिक वादामुळे बायकोच्या डोक्यात कुकर घालून खून; खराडीतील धक्कादायक घटना

Kharadi Crime News : कौटुंबिक वादामुळे बायकोच्या डोक्यात कुकर घालून खून; खराडीतील धक्कादायक घटना

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Apr 07, 2023 08:17 PM IST

Kharadi Crime News : किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून आरोपीने बायकोच्या डोक्यात कुकर घालून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Kharadi Pune Crime News
Kharadi Pune Crime News (HT_PRINT)

Kharadi Pune Crime News : कौटुंबिक कलहातून नवऱ्यानं आपल्याच बायकोच्या डोक्यात कुकर घालून हत्या केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पुण्यातील खराडीमध्ये ही धक्कादायक घटना घडली असून त्यानंतर आता पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. राजेभाऊ पारखे असं आरोपीचं नाव असून रंधावणी पारखे असं मृत महिलेचं नाव आहे. काही दिवसांपूर्वीच कामाच्या शोधात दाम्पत्य परभणीतून पुण्यातील खराडी परिसरात स्थायीक झाले होते. त्यानंतर आता नवऱ्यानंच बायकोची हत्या केल्यामुळं पारखे कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, परभणी जिल्ह्यातून कामाच्या शोधासाठी राजेभाऊ पारखे आणि रंधावणी पारखे हे दाम्पत्य पुण्यातील खराडीच्या थिटेवस्ती भागात रहायला आले होते. परंतु त्यांच्यात सातत्यानं वाद होत होते. दोघांमध्ये वाद झाल्यानंतर शिवीगाळ झाली. त्यानंतर संतापलेल्या आरोपी राजेभाऊ पारखे याने आपल्याच पत्नीच्या डोक्यात कुकर घातला. त्यानंतर या घटनेची माहिती समजताच शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी झालेल्या रंधावणी यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर उपचारादरम्यान रंधावणी यांचा मृत्यू झाला आहे.

रंधावणी पारखे यांचा त्यांचे पती राजेभाऊ पारखे यांनी खून केल्याची घटना समजताच खराडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. याशिवाय पोलिसांनी घटनेनंतर आरोपी राजेभाऊ पारखे यांना अटक केली असून पुढील कार्यवाही केली जात असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

IPL_Entry_Point