मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ambani School : धीरूबाई अंबानी स्कूल उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला गुजरातमधून अटक

Ambani School : धीरूबाई अंबानी स्कूल उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला गुजरातमधून अटक

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jan 12, 2023 12:36 PM IST

Ambani School Threat : मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देणाऱ्यास पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Dhirubhai Ambani International School
Dhirubhai Ambani International School

Ambani School Threat call case : मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल बॉम्बनं उडण्याची धमकी देणाऱ्याला गुजरातमधील मोर्बी येथून अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी ही माहिती दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरात असलेल्या धीरूबाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलच्या कार्यालयातील लँडलाइनवर मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीनं फोन केला होता. ही शाळा बॉम्ब उडवून देणार, अशी धमकी त्या व्यक्तीनं दिली. शाळा व्यवस्थापनानं लगेचच ही माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीनं शाळेच्या परिसराची तपासणी केली. मात्र, ही धमकी अफवा असल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात भादंविच्या कलम ५०५ (१) (ब) आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला व तपासाला सुरुवात केली. 

घटनेनंतर काही वेळातच पोलिसांना कॉल नेमका कुठून आला आहे याचा सुगावा लागला. त्यानुसार पुढील कारवाईला सुरुवात झाली. अखेर मोर्बी येथून पोलिसांनी आज संबंधित इसमाला अटक केली. विक्रम सिंह असं या आरोपीचं नाव असून तो ३५ वर्षांचा आहे. त्याची अधिक चौकशी सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

IPL_Entry_Point

विभाग