मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ठाण्यातील महापालिका शाळेत १० वर्षीय विद्यार्थ्याचा खेळताना मृत्यू, कुटुंबीयांना संशय

ठाण्यातील महापालिका शाळेत १० वर्षीय विद्यार्थ्याचा खेळताना मृत्यू, कुटुंबीयांना संशय

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jan 12, 2023 11:21 AM IST

Thane Municipal School Student Death : ठाणे महापालिकेतील एका शाळेत १० वर्षीय विद्यार्थ्याचा अकस्मात मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली आहे.

Thane Municipal School
Thane Municipal School

Thane Municipal School Student Death : ठाण्यातील एका महापालिकेच्या शाळेत इयत्ता चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा खेळताना अचानक मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली आहे. मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून अहवाल आल्यानंतरच मृत्यूचं नेमकं कारण उघड होणार आहे. मुलाच्या कुटुंबीयांनी मात्र या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

कुणाल चंदनशिवे (वय १० ) असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. घोडबंदर येथील चितळसर मानपाडा परिसरातील महापालिका शाळा क्रमांक ६४ मध्ये तो शिकत होता. शारीरिक शिक्षणाचा तास असल्यामुळं कुणाल वर्गाबाहेर खेळत होता. खेळत असतानाच भोवळ येऊन तो खाली पडला. इतर मुलांना शिक्षकांना ही माहिती दिल्यानंतर कुणालला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. खासगी रुग्णालयानं कुणालला दाखल करून घेण्यास नकार दिल्यावर त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

कुणालच्या मृत्यूमुळं ठाण्यात खळबळ उडाली असून त्याच्या आई-वडिलांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. त्यांनी या घटनेमागे संशय व्यक्त केला आहे. कुणालचा मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कुणालच्या शवविच्छेदनाचा अहवाल आज मिळण्याची शक्यता आहे.

IPL_Entry_Point

विभाग