मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sada Sarvankar : दादरचा राडा आमदार सदा सरवणकर यांच्या अंगलट; बॅलेस्टिक अहवालातून धक्कादायक खुलासा

Sada Sarvankar : दादरचा राडा आमदार सदा सरवणकर यांच्या अंगलट; बॅलेस्टिक अहवालातून धक्कादायक खुलासा

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jan 12, 2023 09:53 AM IST

Sada Sarvankar Firing Case : बॅलेस्टिक तज्ज्ञांनी एका प्रकरणात दिलेल्या अहवालामुळं एकनाथ शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर अडचणीत आले आहेत.

Sada Sarvankar
Sada Sarvankar (HT_PRINT)

Sada Sarvankar Firing Case : शिवसेनेतील फुटीनंतर मुंबईतील गणेश विसर्जना दरम्यान पक्षाच्या दोन गटांमध्ये झालेल्या राड्याच्या वेळी गोळीबार झाला होता. ही गोळी एकनाथ शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्याच पिस्तुलातून सुटल्याचं बॅलेस्टिक अहवालातून समोर आलं आहे. त्यामुळं सदा सरवणकर यांच्या अडचणी वाढणार आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

शिवसेनेतील फुटीनंतर मुंबईतील मंडळं ताब्यात ठेवण्यासाठी ठाकरे व शिंदे यांच्या समर्थकांमध्ये चुरस होती. त्यातूनच दादर इथं गणपती विसर्जनाच्या वेळी दोन्ही गटातील कार्यकर्ते आमनेसामने आले होते. दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी व धक्काबुक्की झाली होती. त्याचवेळी गोळीबारही झाला होता. हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात तक्रारी दिल्या होत्या. त्यातून गुन्हेही दाखल झाले होते. सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा शिवसैनिकांचा आरोप होता. सरवणकर यांच्या विरोधात १५ सप्टेंबर रोजी शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, ती गोळी माझ्या पिस्तुलातून सुटलीच नव्हती, असा दावा सदा सरवणकर यांनी केला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर कायदेशीर प्रक्रियेनुसार पोलिसांनी सरवणकर यांच्याकडील पिस्तूल जप्त केलं होतं. तसंच, घटनास्थळावरून काडतुसे व अन्य काही नमुने जप्त करण्यात आले होते. या सगळ्याची चौकशी बॅलेस्टिक तज्ज्ञांनी केली. त्याचा अहवाल आता समोर आला असून ती गोळी सरवणकर यांच्याच पिस्तुलातून सुटल्याचं स्पष्ट झालं आहे. आता सरवकर यांच्या विरोधात पोलीस नेमकी काय कारवाई करतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

IPL_Entry_Point

विभाग