मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Weather Update : राज्यावर अवकाळी पावसाचे ढग! 'या' जिल्ह्यात बरसणार; असे असेल हवामान

Maharashtra Weather Update : राज्यावर अवकाळी पावसाचे ढग! 'या' जिल्ह्यात बरसणार; असे असेल हवामान

Feb 17, 2024 07:34 AM IST

Maharashtra Weather Update : राज्यात आज कोकण वगळता बहुतांश ठिकाणी अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे. तर किमान तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Weather Update
Maharashtra Weather Update (HT)

Maharashtra Weather Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात चढ उतार पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी पाऊस, काही ठिकाणी थंडी तर काही ठिकाणी उन असा खेळ सध्या राज्यात सुरू आहे. राज्यात कोकण वगळता आज बहुतांश ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात हा पाऊस होणार आहे. तसेच एक पश्चिमी प्रकोप हिमालयाकडे येत आहे. त्यामुळे किमान तापमानात पुढील दोन-तीन दिवसात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे.

CTA icon

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

ट्रेंडिंग न्यूज

Railway mega Block : पुणे-मिरज रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक! अनेक गाड्या रद्द तर काही गाड्या विलंबाने धावणार

पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार आज एक कमी दाबाची रेषा उत्तर कर्नाटक पासून छत्तीसगडच्या मध्यभागापर्यंत आहे. त्यामुळे कोकणाव्यतिरिक्त राज्याच्या उर्वरित भागात तुरळ ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच पुढील चार-पाच दिवस राज्यातील हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. उद्यापासून एक पश्चिमी प्रकोप हिमालयाकडे येत आहे. त्यामुळे किमान तापमानात पुढील दोन-तीन दिवसात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे. १८ तारखे नंतर वीस तारखेपर्यंत वेळोवेळी ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानात किंचित घट होण्याची शक्यता आहे. २१ तारखे नंतर राज्यांमध्ये येणाऱ्या उत्तरी वाऱ्यामुळे आकाश निरभ्र राहील व किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे.

Mumbai Terrorist: मुंबईत दहशतवादी घुसले, पोलीस नियंत्रण कक्षात फोन; एकाला अटक

पुणे मुंबईत असे असेल हवामान

पुणे व आजूबाजूच्या परिसरात पुढील दोन-तीन दिवस आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे. पुढील ४८ तासात हलके धुके पडण्याची शक्यता आहे. १८ तारखेच्या संध्याकाळपासून २० तारखेपर्यंत आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. २१ तारखेच्या दुपार नंतर आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. २१ तारखेनंतर किमान तापमानात जवळजवळ २ ते ३ अंशांनी घट होण्याची शक्यता आहे.

मुंबईत देखील तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या मुंबईत सकाळी थंडी आणि दिवसभर उष्ण आणि दमट वातावरण आहे. पुढील काही दिवस हे वातावरण कायम राहणार आहे. नागपूरमध्येही शनिवारी आणि रविवारी उन्हाच्या झळा वाढणार आहेत. नागपुरात हलक्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज आहे. कोल्हापूरमध्येही वातावरण अधिक उबदार राहणार आहे.

WhatsApp channel