मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Railway mega Block : पुणे-मिरज रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक! अनेक गाड्या रद्द तर काही गाड्या विलंबाने धावणार

Railway mega Block : पुणे-मिरज रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक! अनेक गाड्या रद्द तर काही गाड्या विलंबाने धावणार

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Feb 17, 2024 06:36 AM IST

Pune-Miraj Railway megablock : मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून मेगा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. हा ब्लॉक पुणे-मिरज मार्गावर तारगाव-मसूर-शिरवडे या स्थानकांदरम्यान राहणार असून ब्लॉक काळात लोहमार्ग दुहेरीकरणाची कामे केली जाणार आहे. हा ब्लॉक सुरू झाला असून तो २२ तारखेपर्यंत राहणार आहे.

 megablock
megablock

Pune-Miraj Railway megablock : पुणे मिरज दरम्यान रेल्वे प्रवासाचे नियोजन असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून पुणे-मिरज मार्गावर तारगाव-मसूर-शिरवडे या स्थानकांदरम्यान पुढील सात दिवस मेगा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. लोहमार्ग दुहेरीकरणाच्या कामासाठीहा ब्लॉक घेण्यात आला असून तो सुरू झाला आहे. २२ फेब्रुवारी पर्यंत पुणे मिरज दरम्यान गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या उशिरा धावणार आहेत, अशी माहिती रेल्वेने दिली.

RSMSSB Recruitment: कनिष्ठ सहाय्यक आणि लिपिक पदांच्या ४ हजारांहून अधिक जागांसाठी भरती, येथे करा अर्ज!

या गाड्या रद्द

कोल्हापूर-पुणे एक्स्प्रेस २० व २१ फेब्रुवारीला रद्द करण्यात आली आहे. पुणे-कोल्हापूर एक्स्प्रेस २१ व २३ फेब्रुवारीला रद्द करण्यात आली आहे. कोल्हापूर-मुंबई कोयना एक्सप्रेस आणि मुंबई-कोल्हापूर कोयना एक्सप्रेस या गाड्या २२ फेब्रुवारीला रद्द करण्यात आल्या आहेत.

Mumbai Terrorist: मुंबईत दहशतवादी घुसले, पोलीस नियंत्रण कक्षात फोन; एकाला अटक

कोल्हापूर-सातारा ही गाडी २१ व २२ फेब्रुवारीला कराडपर्यंत धावेल. ही गाडी कराड-सातारा दरम्यान रद्द राहील. सातारा-कोल्हापूर ही गाडी २१ व २२ फेब्रुवारीला कराडपासून धावणार आहे. तर ही गाडी सातारा- कराड दरम्यान रद्द करण्यात आली आहे. पुणे-कोल्हापूर एक्स्प्रेस २१ व २२ फेब्रुवारीला सातारापर्यंत धावणार असून ही गाडी सातारा-कोल्हापूर दरम्यान रद्द करण्यात आली आहे. कोल्हापूर-पुणे एक्स्प्रेस २१ व २२ फेब्रुवारीला सातारा येथून पुण्यासाठी सोडण्यात येणार आहे. ही गाडी कोल्हापूर-सातारा दरम्यान रद्द करण्यात आली आहे. गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस २१ फेब्रुवारीला पुण्यापर्यंत धावणार असून ही गाडी पुणे-कोल्हापूर दरम्यान रद्द करण्यात आली आहे. कोल्हापूर – गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस २२ फेब्रुवारीला पुण्यातून सुटणार असून ही गाडी कोल्हापूर-पुणे दरम्यान रद्द करण्यात आली आहे.

हजरत निजामुद्दीन- यशवंतपूर एक्सप्रेस २१ फेब्रुवारीला दौंड-कुर्डुवाडी-पंढरपूर-मिरज या वळवलेल्या मार्गाने धावेल आणि ही गाडी पुण्याला येणार नाही. बंगळुरू-जोधपूर एक्सप्रेस २१ फेब्रुवारीला मिरज-पंढरपूर-कुर्डुवाडी-दौंड-पुणे या वळवलेल्या मार्गावर धावेल आणि ही गाडी सांगली, कराड आणि सातारा येथे येणार नाही.

उशिरा धावणाऱ्या गाड्या

कोल्हापूर -मुंबई कोयना एक्स्प्रेस कोल्हापूर १७ व १८ फेब्रुवारीला दोन तास उशिराने सुटेल. बंगळुरू-जोधपूर एक्सप्रेस १८ फेब्रुवारीला १ तास २५ मिनिटे आणि १९ फेब्रुवारीला १ तास ४५ मिनिटे उशिराने धावेल. पुणे-कोल्हापूर एक्स्प्रेस १९ फेब्रुवारीला एक तास उशिराने धावेल. मिरज-पुणे विशेष गाडी २० फेब्रुवारीला ३० मिनिटे विलंबाने धावेल. हजरत निजामुद्दीन – वास्को गोवा एक्स्प्रेस २१ फेब्रुवारीला दोन तास विलंबाने धावेल.

WhatsApp channel