मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mission Baramati : बारामती जिंकण्याची भाषा करणाऱ्या बावनकुळेंना अजितदादांनी झापले!

Mission Baramati : बारामती जिंकण्याची भाषा करणाऱ्या बावनकुळेंना अजितदादांनी झापले!

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 08, 2022 03:24 PM IST

NCP vs BJP : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींना बारामतीकर आशिर्वाद देतील’, असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादीचा पराभव करणार असल्याचं वक्तव्य केलं होतं.

अजित पवार चंद्रकांत बावनकुळे
अजित पवार चंद्रकांत बावनकुळे

Ajit Pawar On Chandrasekhar Bawankule On Mission Baramati : गेल्या काही दिवसांपासून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह पक्षाच्या अनेक नेत्यांनी २०२४ मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघात विजय मिळवण्याचा निर्धार केला आहे. याशिवाय 'बारामतीकर मोदींना आशिर्वाद देतील' असं वक्तव्य चंद्रशेखर वावनकुळेंनी केल्यानंतर आता त्याला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, नव्याचे नऊ दिवस असतात, बावनकुळेंनी गप्पा मारणं बंद करावं, मला कोणत्याही मतदारसंघात आव्हान द्या, मी खंबीर आहे, त्यांचं आणि त्यांच्या पत्नीचं तिकीट भाजपनं कापलं होतं, ही त्यांची विश्वासार्हता आहे का?, असा सवाल करत अजित पवारांनी बावनकुळेंना टोला लगावला आहे.

याशिवाय राज्यात स्थापन झालेलं शिंदे-फडणवीस सरकार हे स्थगिती सरकार असून फक्त विकासकामांना स्थगिती देण्याचं काम सुरू आहे. त्यांना खोके म्हटलं की राग येतो, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे.

बारामतीत धडका माराल तर डिपॉझिट जप्त होईल- पवार

बारामतीत धडका घेण्यापेक्षा भाजपनं शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायला हवेत. बारामतीत आपली ताकद आहे. लाखापेक्षा अधिक मतांपेक्षा मी विजयी झालोय. बारामतीला धडका घ्याल तर डिपॉझिट जप्त होईल, असा इशारा अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांना दिला आहे. महाविकास आघाडी सरकारनं ओबीसींना आरक्षण मिळवून देण्यासाठी मेहनत घेतली, परंतु कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच झालं, असं म्हणत त्यांनी शिंदे-फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

IPL_Entry_Point