मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Bus Accident : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर मध्यरात्री दोन अपघात; दोन वाहन चालक ठार

Bus Accident : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर मध्यरात्री दोन अपघात; दोन वाहन चालक ठार

Dec 10, 2023 09:10 AM IST

Mumbai Pune express highway Bus Accident : मुंबई पुणे एक्सप्रेसवे मार्गावर मध्यरात्री दोन अपघात झाले आहे. दुधाचा टँकर आणि कोल्हापूर जाणाऱ्या एका खाजगी बसचा अपघात या दोन अपघातात दोघे ठार झाले आहे.

Mumbai Pune express highway Bus Accident
Mumbai Pune express highway Bus Accident

Mumbai Pune express highway Bus Accident : मुंबई पुणे एक्सप्रेसवे वर शनिवारी मध्यरात्री दोन अपघात झाले. या दोन्ही अपघातात वाहनचालकांचा मृत्यू झाला आहे. एक अपघात रात्री १२ वाजता तर दूसरा अपघात हा पहाटे ३ वाजता झाला. अपघात ठार झालेल्या वाहन चालकांची नावे समजू शकली नाही.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर अपघातांची मालिका सुरुच आहे. गुरुवारी देखील एक बसचा अपघात टळला होता. दरम्यान, ही घटना ताजी असतांना शनिवारी रात्री दोन अपघात झाले. पहिला अपघात हा मध्यरात्री १२ वाजता झाला. एक दुधाचा टँकर हा मुंबई पुणे एक्सप्रेसवे ने जात असतांना या टँकरने एका वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की टँकरचा चक्काचूर होऊन चालकाचा जागीच मृत्यू झाला.

ट्रेंडिंग न्यूज

या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिस आणि देवदूतचे कर्मचारी घटनास्थळी जाऊन त्यांनी बचाव कार्य केले. हा अपघात झाल्यावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. पोलीस आणि स्थानिक रहिवाशांच्या मदतीने क्रेनच्या साह्याने टँकर बाजूला करून वाहतूक सुरुळीत करण्यात आली.

दूसरा अपघात हा पहाटे ३ च्या सुमारास झाला. एक खासगी बस ही मुंबई पुणे एक्सप्रेस वे मार्गाने कोल्हापूरला जात होती. यावेळी एका अज्ञात वाहनाने बसला धडक दिल्याने हा अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, बसचालकाचा मृत्यू झाला तर बस मधील ११ प्रवासी हे जखमी झाले. जखमींना तातडीने खोपोली आणि पनवेल एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या बसमध्ये १५ ते २० जण प्रवास करत होते. या अपघातानंतर देखील या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.

WhatsApp channel
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर