Trains to delhi are running late : देशभरातून राजधानी दिल्ली येथे जाण्यासाठी विविध एक्सप्रेस गाड्या रोज धावतात. मात्र, बहुतांश गाड्या या तब्बल १ ते २ तास उशिराने धावत आहेत. राज्यातून दिल्ली येथे जाणाऱ्या पाच एक्सप्रेस गाड्या देखील तब्बल १.३० ते २ तास उशिराने धावत आहेत. यामुळे प्रवाशांची मात्र, गैरसोय होत आहे.
राजधानी दिल्लीला विविध रेल्वेमार्गाने जोडले जाते. उत्तर, दक्षिण, मध्य रेल्वे, उत्तर रेल्वे या सर्व मार्गावरून काही एक्सप्रेस गाड्या या रोज तर काही एक दिवसाआड तर काही आठवड्यातून १ वेळा धावत असतात. महाराष्ट्रातून दिल्ली येथे पाच गाड्या नागपूर मार्गे जातात. या सर्व गाड्या सध्या १ ते २ तास उशिराने धावत आहेत.
बंगलोर न्यू दिल्ली राजधानी एक्सप्रेस (२२६९१) ही गाडी तब्बल १ तासाने उशिरा धावत आहे. तर सिकंदराबाद निजमुद्दीन एक्सप्रेस (१२४३७) ही रेल्वे २.३० तास उशिराने धावत आहे. ही गाडी राज्यातील चंद्रपूर जिल्ह्यातील बलारशा, चंद्रपूर, नागपूर मार्गे दिल्लीला जाते. चेन्नई नवी दिल्ली जीटी (१२६१५) ही एक्सप्रेस गाडी देखील २.१५ मिनिटांनी उशिरा धावत आहे. ही गाडी देखील राज्यातील चंद्रपूर जिल्ह्यातील बलारशा, चंद्रपूर, नागपूर मार्गे दिल्लीला जाते. चेन्नई न्यू दिल्ली एक्सप्रेस गाडी देखील (१२६२१) २ तास उशिराने धाव आहे. तर हेद्राबाद-दिल्ली (१२७२३) ही गाडी देखील उशिराने धावत आहे.
अनेक ठिकाणी रेल्वे सिग्नल यंत्रणा तर रेल्वे ट्रॅक दुरुस्तीची कामे सुरू आहेत. या सारख्या विविध कारणांमुळे या गाड्या उशिरा धावत आहेत. तरी प्रवाशांना होणाऱ्या गैरसोई बद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.