Ayodhya air ticket : दुबई, सिंगापूरपेक्षा अयोध्येचे तिकीट महाग; दर किती माहित्येय?
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Ayodhya air ticket : दुबई, सिंगापूरपेक्षा अयोध्येचे तिकीट महाग; दर किती माहित्येय?

Ayodhya air ticket : दुबई, सिंगापूरपेक्षा अयोध्येचे तिकीट महाग; दर किती माहित्येय?

Jan 11, 2024 10:04 AM IST

Ayodhya air ticket rate hike : येत्या २२ तारखेला अयोध्या येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्री रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा केली जाणार आहे. यामुळे आयोध्या येथे विमान तिकीटांच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

ayodhya air ticket rate hike
ayodhya air ticket rate hike (HT_PRINT)

ayodhya air ticket rate hike : अयोध्येतील राम मदिरात २२ जानेवारी रोजी राम लल्लाच्या मूर्तीची प्राण-प्रतिष्ठापना केली जाणार आहे. या कार्यक्रमासाठी जय्यत तयारी केली जात आहे. या सोहळ्यासाठी देशातूनच नव्हे तर जगभरातून नागरीक अयोध्येत दाखल होणार आहे. अयोध्या येथे विमानतळाचे उद्घाटन झाले असून अनेक जण येथे येण्यासाठी विमानाची तिकिटे बुक करत आहे. मात्र, अयोध्या विमानाचे दर हे गगनाला पोहचले आहे. सिंगापूर पेक्षा जास्त रक्कम आयोध्येचे तिकीट काढण्यासाठी खर्च करावी लागत आहे.

शेकोटी पेटवणे बेतले जिवावर! पती-पत्नीचा गुदमरून मृत्यू, तर दोन महिन्यांचे बाळ आयसीयूत

अयोध्या येथील प्राण-प्रतिष्ठापना कार्यक्रमासाठी ८ हजाराहून अधिक व्हीआयपी लोक देश-विदेशातून येणार आहेत. अयोध्या विमानतळावर कमर्शियल फ्लाइटसोबतच ४० चार्टर्ड प्लेन उतरवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अयोध्या एयरपोर्टवर सध्या ८ शहरांसाठी एअरपोर्ट कनेक्टिविटी सुरू झाली आहे. या शहरांमध्ये लखनऊ, दिल्ली, मुंबई, कोलकाता अहमदाबाद, चेन्नई आणि गोवा शहरांचा समावेश आहे.

Indian Railway : महत्वाची बातमी! पुण्यातून दक्षिण व उत्तर भारतात जाणाऱ्या १६ गाड्या २५ दिवस रद्द; 'हे' आहे कारण

अयोध्येमध्ये राममंदिरात श्रीरामांच्या - प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रमच्या पार्श्वभूमीवर थेट अयोध्येकरिता विमान सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांचा, तसेच पर्यटकांचा अयोध्येकडील ओढा आहे. परिणामी यामुळे तेथील विमान तिकिटांनी एकेरी मार्गासाठी २० हजारांचा दर गाठला आहे. मुंबई ते अयोध्या या एकेरी मार्गावरील दर देखील अनेक लोकप्रिय आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळांच्या पुढे गेले आहेत.

या सोहळ्याला येण्यासाठी अनेक जण उत्सुक असून हे दर देऊन नागरीक विमान तिकीट बुक करत आहेत. आंतरराष्ट्रीय विमान तिकीट दारांचा विचार केल्यास मुंबई ते दुबई साठी १६,९३७ रुपये भाडे विमान कंपन्या आकारतात. तर मुंबई ते सिंगापूरसाठी १३,८०० रुपये दर आकरला जातो. मुंबई ते बँकॉकसाठी १६,९३७ दर अकरला जातो. तर अयोध्या येथे मुंबईला जाण्यासाठी एकेरी मार्गाचा सध्याचा दर हा तब्बल २०,७०० एवढा आहे. येत्या १९ जानेवारीपासून मुंबई ते अयोध्या (महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ) अशी विमान सेवा इंडिगो कंपनीतर्फे सेवा सुरू केली जाणार आहे. या फ्लाइटचे दर हे २०, ७०० रुपये एवढे आहेत. अनेक नागरीक प्रभू रामाच्या दर्शनासाठी खिशाला झळ पोहचवून हे जादा दर असलेले तिकीट देखील काढत आहेत.

Whats_app_banner
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर