मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  HSC EXAM 2023 : परीक्षेच्या तणावातून बारावीच्या विद्यार्थ्यांने संपवले आयुष्य, पनवेलमधील घटना

HSC EXAM 2023 : परीक्षेच्या तणावातून बारावीच्या विद्यार्थ्यांने संपवले आयुष्य, पनवेलमधील घटना

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Feb 21, 2023 04:29 PM IST

studentcommitsuicide : बारावीच्या परीक्षेच्या तणावातून पनवेलमधील विद्यार्थ्याने गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे. राज्यात परीक्षेच्या दोन दिवस आधीच दोन विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या भीतीने आत्महत्या केल्या आहेत. पहिली घटना औरंगाबादमध्ये घडली त्यानंतर आता पनवेलमध्येही अशीच घटना घडली आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डच्या एचएससी परीक्षा आजपासून सुरू झाल्या आहेत. बारावी परीक्षेचा आज पहिला पेपर संपला आहे. मात्र परीक्षा देण्याआधीच अभ्यासाच्या तणावातून एका विद्यार्थ्याने आपले आयुष्यच संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना पनवेलमधील देवदर्शन सोसायटीत घडली आहे. वंश म्हात्रे (वय १७) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

वंश म्हात्रे परीक्षेच्या दडपणाखाली गेल्या काही दिवसापासून अस्वस्थ होता, अशी माहिती आई-वडिलांनी दिली आहे. सोमवारी, (२० फेब्रुवारी) परीक्षेच्या एक दिवस आधी वंश याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. त्यावेळी त्याचे आई-वडील घरी नव्हते. वंशचे आई-वडील घरी आल्यानंतर त्यांना दरवाजा आतून बंद असल्याचे दिसून आले. त्यांनी लॅचने दरवाजा उघडल्यानंतर त्यांना आपला मुलगा पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. 

पनवेल पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. परीक्षेच्या तणावातून आत्महत्येसारखे पाऊल न उचलण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 

 

IPL_Entry_Point