मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Shegaon Earthquake : शेगाव, बाळापूर भूकंपाच्या धक्क्याने हादरले, रिश्टर स्केलवर इतकी नोंद

Shegaon Earthquake : शेगाव, बाळापूर भूकंपाच्या धक्क्याने हादरले, रिश्टर स्केलवर इतकी नोंद

Mar 26, 2024 10:52 PM IST

Earthquakes In shegaon :शेगावला मंगळवारी सायंकाळच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. रिश्टर स्केलवर याची तीव्रता २.९ इतकी नोंदवली गेली. बाळापूरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले.

शेगाव, बाळापूर भूकंपाच्या धक्क्याने हादरले
शेगाव, बाळापूर भूकंपाच्या धक्क्याने हादरले

विदर्भातील पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या शेगावला मंगळवारी सायंकाळच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. सायंकाळी सव्वा सहा वाजता हे धक्का जाणवले. रिश्टर स्केलवर याची तीव्रता २.९ इतकी नोंदवली गेली. या धक्क्यामुळे अनेकांच्या मनात भीती निर्माण झाली तर काहींना धक्का जाणवला नाही. 

शेगावचे तहसीलदार डी आर बाजड यांनीही भूकंपाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, शेगावात २.९ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. नागरिकांनी घाबरू नये असे आवाहनही तहसीलदारांनी केले आहे. 

दरम्यान शेगाव शहरालगत असलेल्या बाळापूरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. वाढते तापमान आणि भूगर्भातील बदल यामुळे हे धक्के जाणवल्याने तज्ज्ञांनी म्हटले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

दरम्यान २१ मार्च २०२४ रोजी मराठवाड्यातील हिंगोली, परभणी व नांदेड जिल्ह्यातील अनेक भागात सकाळी ६.०८ मिनिटांनी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची नोंदी ४.५ करण्यात आली. भूकंपाचे केंद्र  वसमत तालुक्यातील दांडेगावजवळील रामेश्वर तांडा होते. भूकंपाचे केंद्र जमिनीत १० किलोमीटर खोल होते. त्यानंतर दुसरा धक्काही जाणवला. त्याची नोंद ३.६ रिश्टर स्केल इतका होता. ३० सप्टेंबर १९९३ रोजी लातूर जिल्ह्यातील किल्लारीत झालेल्या भूकंपानंतर आताच्या काळातील सर्वात मोठा धक्का असल्याचे सांगण्यात येत आहे.

WhatsApp channel
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर