Shegav : गण गण गणात बोते! संत गजानन महाराजांच्या १४६ व्या प्रकट दिनी शेगाव नगरी टाळ मृदंगाच्या गजराने दुमदुमली
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Shegav : गण गण गणात बोते! संत गजानन महाराजांच्या १४६ व्या प्रकट दिनी शेगाव नगरी टाळ मृदंगाच्या गजराने दुमदुमली

Shegav : गण गण गणात बोते! संत गजानन महाराजांच्या १४६ व्या प्रकट दिनी शेगाव नगरी टाळ मृदंगाच्या गजराने दुमदुमली

Published Mar 03, 2024 10:59 AM IST

Sant Gajanan Maharaj Prakat Din : शेगाव येथे आज गजानन महाराजांचा १४६ प्रकटदिन (Gajanan Maharaj) साजरा केला जात आहे. या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून राज्यभरातून मोठ्या प्रमाणात भाविक शेगाव येथे जमले आहेत.

संत गजानन महाराजांच्या १४६ व्या प्रकट दिनी शेगाव नगरी टाळ मृदंगाच्या गजराने दुमदुमली
संत गजानन महाराजांच्या १४६ व्या प्रकट दिनी शेगाव नगरी टाळ मृदंगाच्या गजराने दुमदुमली

Sant Gajanan Maharaj Prakat Din : शेगाव येथे आज संत गजानन महाराजांचा १४६ वा प्रकटदिवस आहे. या निमित्त शेगाव नगरी टाळ मृदुंगाच्या गजराने दुदुमली आहे. मोठ्या प्रमाणात राज्यभरातून भाविक शेगावमध्ये जमले आहे. तब्बल ७०० हून अधिक दिड्यांचे आगमन झाले आहे. आज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्रींच्या समाधी मंदिरावर, परिसर आणि प्रवेशद्वारावर रंगीबेरंगी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

Amravati crime : अमरावती हादरले! १०० रुपयांच्या दारूसाठी नराधम मुलानं केला जन्मदात्या आईचा खून

शेगाव येथे गेल्या आठवड्यापासून विविध धार्मीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिरात महारुद्रस्वाहाकार, काकडा, भजन, दुपारी प्रवचन सायंकाळी हरिपाठ कीर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रम केले जात आहे. या सोबतच राज्यभरतून मोठ्या भजनी दिंड्या शेगाव येथे दाखल झाल्या आहेत.

BJP Candidates List 2024 : भाजपच्या पहिल्या यादीतून दिग्गज मंत्र्यांना डच्चू, पाहा संपूर्ण यादी

दरम्यान, आज मंदिरात पहाटे पासून धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. १० वाजता महारुद्रस्वाहाकार याग होणार आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत कीर्तन होणार आहे. तर ४ वाजता श्रींची पालखी परिक्रमा संपूर्ण परिक्रमा मार्गाने काढण्यात येणार आहे. संध्याकाळी ही परिक्रमा आटोपून पालखी मंदिरात येणार आहे. यानंतर मंदिरात महाआरती व वारकऱ्यांचा रिंगण सोहळा होणार आहे. त्यानंतर पालखी परिक्रमेची सांगता होईल. सोमवारी सकाळी ७ ते ८ दरम्यान, काल्याचे किर्तनाने आयोजन करण्यात आले असून याने प्रकटदिन कार्यक्रमाची सांगता होणार आहे.

राज्यात असलेल्या गजानन महाराजांच्या मंदिरात प्रकटदिन सोहळा उत्साहात साजरा केला जाणार आहे. पुणे, मुंबई नागपूर, नाशिक यासह विविध जिल्ह्यात वेगवेगळ्या मंदिरात गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूरच्या न्यू मनीषनगर भागातील जय दुर्गा सोसायटी सहामध्ये रविवारी सकाळीच प्रकटदिन उत्सवाला सुरुवात झाली. सकाळी अभिषेकपूजा, पोथीवाचन व नंतर सामाजिक उपक्रम घेतले जात आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या