मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Supreme Court Hearing : महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, गृह विभागाकडून पोलिसांना अलर्ट राहण्याचे आदेश

Supreme Court Hearing : महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, गृह विभागाकडून पोलिसांना अलर्ट राहण्याचे आदेश

Atik Sikandar Shaikh HT Marathi
May 11, 2023 09:51 AM IST

Maharashtra Police On Alert : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील १६ आमदारांच्या अपात्रतेवर थोड्याच वेळात सुप्रीम कोर्टातून निकाल येणार आहे.

Maharashtra Police On Alert
Maharashtra Police On Alert (HT)

Supreme Court Hearing On Maharashtra Political Crisis Today Live : राज्यातील सत्तासंघर्षाच्या प्रकरणावर थोड्याच वेळात सुप्रीम कोर्टातून निकाल येणार आहे. सरन्यायाधीश धनंजय यशवंत चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांचं खंडपीठ ऐतिहासिक निकाल देणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील १६ आमदारांच्या अपात्रतेवर निकाल येणार असल्यामुळं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र पोलिसांना अलर्ट राहण्याचे आदेश जारी केले आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राज्यातील कुठल्याही शहरात राजकीय तेढ अथवा संघर्ष निर्माण होऊ नये, यासाठी गृहविभागाने हा निर्णय घेतल्याची माहिती आहे. त्यानंतर आता राजधानी मुंबईसह पुणे, नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या शहरांमध्ये कडक सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सुप्रीम कोर्टाने जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अपात्र ठरवलं तर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळं ठाकरे आणि शिंदे गटाचे नेते, कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष होण्याची चिन्हं असतानाच गृहविभागाने पोलिसांना अलर्ट राहण्याचे आदेश दिले आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राज्यातील कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्याच्या दृष्टीने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळं आता राज्यातील अनेक शहरांमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालापूर्वी शिंदे आणि ठाकरे गटाचे अनेक नेते मुंबईत दाखल झाले आहेत.

सुप्रीम कोर्टाचं कामकाज सकाळी दहा वाजता सुरू होणार आहे. त्यानंतर सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड हे दिल्ली सरकार विरुद्ध राज्यपाल या खटल्यातील निकाल सुनावतील. त्यानंतर अकरा ते साडेअकरा वाजेच्या सुमारास राज्यातील सत्तासंघर्षाच्या प्रकरणावर अंतिम निकाल सुनावला जाणार आहे. सुप्रीम कोर्टातील पाचही न्यायाधीशांचं सत्तासंघर्षाच्या प्रकरणावर एकमत झालं असून फक्त सरन्यायाधीश हे निकाल वाचून दाखवणार आहेत.

IPL_Entry_Point