मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Narhari Zirwal : सुप्रीम कोर्टाच्या निकालाआधी विधानसभेचे माजी उपाध्यक्ष नरहरी झिरवळ नॉट रिचेबल, संजय राऊतांचं सूचक ट्वीट

Narhari Zirwal : सुप्रीम कोर्टाच्या निकालाआधी विधानसभेचे माजी उपाध्यक्ष नरहरी झिरवळ नॉट रिचेबल, संजय राऊतांचं सूचक ट्वीट

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
May 11, 2023 09:55 AM IST

Narhari Zirwal not reachable : राज्यातील सत्तासंघर्षाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे माजी उपाध्यक्ष नरहरी झिरवळ 'नॉट रिचेबल' झाले आहेत.

Narhari Zirwal
Narhari Zirwal

Narhari Zirwal not reachable : राज्यातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येणार असून त्या पार्श्वभूमीवर वेगवान घडामोडी घडत आहेत. राज्य विधानसभेचे माजी उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे अचानक 'नॉट रिचेबल' आहेत. हे समजताच शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी सूचक ट्वीट केलं आहे.

'काय झाडी, काय डोंगर, काय हिरवळ, आज वाट पाहतोय तुमची, नरहरी झिरवळ… जय महाराष्ट्र!' अशा आशयाचे ट्वीट राऊत यांनी केलं आहे. हे ट्वीट सध्या व्हायरल होत आहे. राऊत यांनी हे ट्वीट नेमकं कोणत्या अर्थानं केलं आहे, याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत. महाविकास आघाडीनंच झिरवळ यांना नॉट रिचेबल राहण्यास सांगितलं आहे की त्यामागे वेगळं काही आहे, याची चर्चा सुरू झाली आहे.

Sanjay Raut Tweet
Sanjay Raut Tweet

शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेल्या व राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या १६ आमदारांविरोधात तत्कालीन विधानसभा उपाध्यक्षांनी अपात्रतेची नोटीस बजावली होती. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं होतं. अन्य काही याचिकांसह यावर आज सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे. त्यामुळं राज्यातील शिंदे सरकारचं भवितव्य अंधारात आहे.

सरकार कोसळल्यास त्याचा मोठा राजकीय फटका भारतीय जनता पक्ष व शिंदे गटाला बसणार आहे. त्यामुळं निकाल विरोधात गेला तरी सरकारला धोका होऊ नये असा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न असणार आहे. त्या दृष्टिकोनातून सध्याच्या राजकीय घडामोडींकडं पाहिलं जात आहे.

IPL_Entry_Point

विभाग