मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Karnataka Exit Poll Result 2023 : कर्नाटकमध्ये काँग्रेस बहुमताच्या जवळ; JDS ठरणार 'किंगमेकर', पाहा भाजपची स्थिती

Karnataka Exit Poll Result 2023 : कर्नाटकमध्ये काँग्रेस बहुमताच्या जवळ; JDS ठरणार 'किंगमेकर', पाहा भाजपची स्थिती

Shrikant Ashok Londhe HT Marathi
May 10, 2023 10:33 PM IST

Karnataka Exit Poll Result :कर्नाटकमध्ये त्रिशंकू विधानसभेचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे.

Karnataka Exit Poll Result
Karnataka Exit Poll Result

Karantaka Exit Poll 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोल येण्यास सुरुवात झालीअसून कोणालाही स्पष्ट बहुमत नसल्याचे दिसत आहे. कर्नाटकमध्ये त्रिशंकू विधानसभेचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. काँग्रेस या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरणार असल्याचा अंदाज असूनएच.डी. देवेगौडा यांचा जनता दल(धर्मनिरपेक्ष) किंगमेकर ठरणार असल्याचे म्हटले जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

काय सांगतात एक्झिट पोलचे अंदाज -

 

  • एबीपी न्यूज व सी वोटरच्या एक्झिटपोलनुसार भाजपला ८३ ते ९५ जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला १०० ते ११२ जागा मिळू शकतात. जेडीएसच्या खात्यात २१ ते २९ जागा जाऊ शकतात तर अन्य पक्षाच्या वाट्याला २ ते ६ जागा जाण्याची शक्यता आहे.
  • झी आणि मॅट्रिझच्या एक्झिट पोलनुसार कर्नाटकमध्ये काँग्रेससर्वात मोठा पक्ष ठरू शकतो. काँग्रेसला १०३-११८ जागा, तर भाजपला ७९-९४ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर जेडीएसला २५-३३ जागा मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय अन्यच्या खात्यात २ ते ५ जागा जाऊ शकतात.
  • रिपब्लिक टीव्ही आणि पी पार्कने प्रसिद्ध केलेल्या एक्झिट पोलमध्येकर्नाटकात त्रिशंकू स्थिती निर्माण होऊ शकते, असा अंदाजवर्तवण्यात आला आहे.सत्ताधारी भाजपला ८५-१००, काँग्रेसला ९४-१०८ आणि जेडीएसला २४-३२ जागा आणि अन्य पक्षांच्या खात्यात २ ते ६ जागा जाण्याचा अंदाजआहे.
  • न्यूज नेशन-सीजीएस एक्झिट पोलनुसार,भाजप११४जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवू शकते. तर,काँग्रेसला८६आणि जेडीएसला२१जागा मिळण्याची शक्यता आहे. तीन जागा इतर पक्षांच्या किंवा अपक्षांच्या खात्यात जाऊ शकतात.
  • सुवर्ण न्यूज-जन की बात एक्झिट पोलनुसार, भाजपला ९४ ते ११७ जागा मिळू शकतात, तर काँग्रेसला ९१ ते १०६ जागा मिळू शकतात. जेडीएसला १४ ते २४ जागा मिळतील आणि इतरांना २ जागा मिळू शकतात.
  • टीव्ही ९ भारतवर्ष-पोलस्ट्रेट एक्झिट पोलनुसार, भाजपला ८८ ते ९८ जागा मिळू शकतात, तर काँग्रेसला ९९ ते १०९ जागा मिळू शकतात. बहुमतापेक्षा हा आकडा कमी आहे. या एक्झिट पोलमध्ये जेडीएसला २१ ते २६ जागा मिळण्याची अपेक्षा आहे, तर इतरांना ० ते ४ जागा मिळू शकतात.
  • टाइम्स नाऊच्या एक्झिट पोलनुसार, भाजपला ७८ ते ९२ जागा, काँग्रेसला १०६ ते १२० जागा मिळण्याची शक्यता आहे. तर, जेडीएसला २० ते २६ आणि इतर पक्षांच्या खात्यात २ ते ४ जागा जाण्याची शक्यता आहे. 

 

 

 

 

IPL_Entry_Point

विभाग