Mumbai Railway mega block : मध्य रेल्वेने विविध तांत्रिक आणि दुरुस्तीच्या कामासाठी आज रविवारी ठाणे ते कल्याण आणि कुर्ला ते वाशीदरम्यान मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घोषित केला आहे. ब्लॉक काळात अनेक लोकलफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे काही गाड्या या उशिराने धावणार आहे तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहे. नागरिकांनी रेल्वेचे वेळापत्रक तपासून घराबाहेर पडण्याचे आवाहन रेल्वेने केले आहे. या सोबतच पश्चिम रेल्वे मार्गावर देखील शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेतल्याने रविवारी दिवसा चर्चगेट ते विरार/ डहाणू रोडदरम्यान कोणताही ब्लॉक राहणार नाही असे देखील रेल्वेने सांगितले आहे.
परिणाम - ब्लॉक वेळेत जलद मार्गावरील सर्व लोकल धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते दादर येथून सुटणाऱ्या मेल-एक्स्प्रेस ठाणे ते कल्याणदरम्यान पाचव्या मार्गावरून धावणार आहेत. मुंबईकडे येणाऱ्या मेल-एक्स्प्रेस सहाव्या मार्गावरून धावतील. ब्लॉकमुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून, काही विलंबाने धावणार आहेत.
मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण या मार्गावर अप आणि डाऊन जलद लोकल सेवा ही सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० बंद ठेवण्यात येणार आहे. ब्लॉक वेळेत जलद मार्गावरील सर्व लोकल धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते दादर येथून सुटणाऱ्या मेल-एक्स्प्रेस ठाणे ते कल्याणदरम्यान पाचव्या मार्गावरून धावणार आहेत. मुंबईकडे येणाऱ्या मेल-एक्स्प्रेस सहाव्या मार्गावरून धावणार आहेत. तर ब्लॉकमुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहे. तर काही गाड्या या उशिराने धावणार आहेत.
कल्याण येथून सकाळी १०.२८ ते दुपारी ३.२५ वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप जलद/ स्लो लोकल कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांवर थांबतील व आपल्या गंतव्यस्थानी १० मिनिटे उशीराने पोहचतील.
हार्बर रेल्वेच्या कुर्ला ते वाशी या अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० दरम्यान, ब्लॉक राहणार असून या काळात सीएसएमटी ते वाशी बेलापूर पनवेलदरम्यान धावणाऱ्या अप आणि डाऊन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. प्रवाशांच्या सुविधेसाठी पनवेल ते वाशीदरम्यान विशेष फेऱ्या चालवण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.