मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Accident : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर कार-ट्रकचा भीषण अपघात; दोन ठार, दोघे जखमी

Pune Accident : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर कार-ट्रकचा भीषण अपघात; दोन ठार, दोघे जखमी

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Apr 04, 2023 12:02 PM IST

Accident on Mumbai pune express way : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर मंगळवारी रात्री अडीचच्या सुमारास मळवली येथे कार आणि मालवाहू ट्रकचा भीषण अपघात झाला. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले.

Accident on Mumbai pune express way
Accident on Mumbai pune express way

पुणे : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर मंगळवारी रात्री अडीचच्या सुमारास कार आणि मालवाहू ट्रकचा भीषण अपघात झाला. हा अपघात मळवली येथे झाला. ही कार पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात असतांना मालवाहू ट्रकला धडकली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले.

ट्रेंडिंग न्यूज

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार या अपघातात जय सावंत आणि विकास सावंत यांचा मृत्यू झाला आहे. तर अश्विनी राणे आणि आर्या सावंत या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. हा अपघातात एवढा भीषण होता की कारच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला आहे. कार आणि मालवाहू ट्रक एकाच लेनवर असताना हा अपघात झाला आहे. कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. राणे आणि सावंत कुटुंब हे सिंधुदुर्ग येथील आहे. ते पुण्यातून मुंबईतील मुलुंड येथे जात होते. तेव्हा प्रवाशांपैकी दोघांवर काळाने घाला घातला.

दरम्यान, नगर आणि कल्याण मार्गावर देखील काल रात्री अपघात झाला. या अपघातात पाच जण ठार झाले. घटना माळशेज घाटाजवळ रात्री १० च्या सुमारास घडली असून यात इनोव्हातील पाच जण ठार झाले आहेत तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. सुदैवाने या अपघातात पीकअप चालक थोडक्यात बचावला. हा अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला. एवढेच नाही तर इनोव्हामधील एयरबॅग तुटून वेगळी झाली होती.

 

IPL_Entry_Point

विभाग