मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  NMIMS University : वर्गात गाणे वाजवल्याने मुंबईच्या एनएमआयएमएस विद्यापीठात विद्यार्थ्यांना इंटरनेट वापरण्यास बंदी

NMIMS University : वर्गात गाणे वाजवल्याने मुंबईच्या एनएमआयएमएस विद्यापीठात विद्यार्थ्यांना इंटरनेट वापरण्यास बंदी

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Apr 04, 2023 11:16 AM IST

NMIMS University restricts internet access to prevent misuse : एनएमआयएमएस विद्यापीठातील द्वितीय वर्षाच्या बीकॉम (ऑनर्स)च्या एका वर्गातील १८० विद्यार्थ्यांनी भर वर्गात गाणे वाजवल्याने संपूर्ण वर्गाला निलंबित करण्यात आले.

NMIMS University restricts internet access to prevent misuse
NMIMS University restricts internet access to prevent misuse

मुंबई: एनएमआयएमएस विद्यापीठात वर्गात पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन सुरू असतांना विद्यार्थ्यांनी इंटरनेटचा वापर करून गाणे लावण्याने तब्बल १८० विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आले. विद्यापीठाने कडक कारवाई करत दोन दिवसांच्या निलंबनानंतर विद्यापीठ परिसरात इंटरनेट बंदी करण्यात आली आहे. नेटचा होणारा गैरवापर टाळण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने हे पाऊल उचलल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

ट्रेंडिंग न्यूज

एनएमआयएमएस विद्यापीठातील बीकॉमच्या विद्यार्थ्यांचा वर्ग सुरू असतांना पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन दरम्यान, फोन स्मार्टबोर्डशी कनेक्ट करून वर्गात गाणे वाजवण्यात आले होते. या घटनेनंतर प्राध्यापकाने विद्यापीठ प्रशासनाकडे याची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर विद्यापीठाच्या अनिल सुरेंद्र मोदी स्कूल ऑफ कॉमर्समधील १८० विद्यार्थ्यांचा संपूर्ण वर्ग निलंबित करण्यात आला होता. या संस्थेच्या एका अधिकार्‍याने सांगितले की, द्वितीय वर्षाच्या बीकॉम (ऑनर्स) विद्यार्थ्यांच्या विरोधात गैरवर्तनाच्या तक्रारी वाढल्या.

कोरोना बंदी नंतर हा वर्ग भरला होता. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या बेशिस्त वागणुकीमुळे येथील अद्यापक वर्ग त्रस्त झाला होता. मुळे वर्ग सुरू असतांना मध्येच बाहेर जात होते. तसेच अद्यापक शिकवतांना मुले गोंधळ घालत होते. दरम्यान, वर्गात गाणी वाजवल्याच्या घटनेमुळे मुलांवर कठोर कारवाई करण्यात आली. त्याच्याच भाग म्हणून १८० विद्यार्थ्यांचा सर्व वर्गाला निलंबित करण्यात आले.

विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू मीना चिंतामनेनी या संदर्भात म्हणाल्या की, कॅम्पसमधील कोणत्याही प्रकारच्या विद्यार्थ्यांच्या गैर वागणुकीबद्दल विद्यापीठाचे शून्य-सहिष्णुता धोरण रणार आहे. भर वर्गात २४ मार्च रोजी मुलांनी गाणे वाजवल्याने संपूर्ण वर्ग निलंबित करण्यात आला. दोन दिवस मुलांवर ही बंदी लावण्यात आली होती. दरम्यान, भविष्यातील गैर प्रकार रोखण्याच्या दृष्टीने विद्यापीठ परिसरात इंटरनेट बंदी देखील लागू करण्यात आली आहे. महाविद्यालयाच्या आवारात केवळ मान्यताप्राप्त शैक्षणिक साइट बघण्याची परवानगी देण्यात आली आहे.

IPL_Entry_Point

विभाग