मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Bhiwandi Building Collapsed : भिवंडीत तीन मजली इमारत कोसळली, ५० जण ढिगाऱ्याखाली अडकले; बचावकार्य जारी

Bhiwandi Building Collapsed : भिवंडीत तीन मजली इमारत कोसळली, ५० जण ढिगाऱ्याखाली अडकले; बचावकार्य जारी

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Apr 29, 2023 07:05 PM IST

Building Collapsed In Bhiwandi : भिवंडीत तीन मजली इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Building Collapsed In Valapada Bhiwandi
Building Collapsed In Valapada Bhiwandi (HT)

Building Collapsed In Valapada Bhiwandi : भिवंडीतील वलपाडा परिसरात तीन मजली इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वर्धमान कंपाऊंड नावाची इमारत कोसळली असून त्याच्या ढिगाऱ्याखाली ४० ते ५० जण दबल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून मदत व बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. इमारत कोसळल्याच्या घटनेत आतापर्यंत कोणतीही जीवीतहानी झाल्याचं वृत्त समोर आलेलं नाही. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडीतील वलपाडा परिसरातील वर्धमान कंपाऊंड नावाची इमारात दुपारी दीड वाजेच्या सुमारास अचानक कोसळली. त्यानंतर लोकांची एकच धावपळ उडाली. वर्धमान कंपाऊंड इमारतीत ४० ते ५० जण दबल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळं आता या घटनेनंतर भिवंडीतील अनेक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्यात भाग घेण्यास सुरुवात केली आहे.

APMC Election 2023 : वैजापूर बाजार समितीवर भाजप-शिंदे गटाचे वर्चस्व; आमदार बोरनारेंनी बाजी मारली

शहरातील वलपाडा परिसरात इमारत कोसळल्याची माहिती मिळताच भिवंडी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत मदत व बचावकार्य सुरू केलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून वलपाड्यातील ही इमारत मोडकळीस आल्याची माहिती होती. परंतु त्यावर पालिकेने कोणतीही कारवाही न केल्यामुळंच ही घटना घडल्याचं बोललं जात आहे.

IPL_Entry_Point