मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  APMC Election 2023 : वैजापूर बाजार समितीवर भाजप-शिंदे गटाचे वर्चस्व; आमदार बोरनारेंनी बाजी मारली

APMC Election 2023 : वैजापूर बाजार समितीवर भाजप-शिंदे गटाचे वर्चस्व; आमदार बोरनारेंनी बाजी मारली

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Apr 29, 2023 01:48 PM IST

Chhatrapati Sambhaji Nagar Vaijapur Market Committee Election Result : वैजापूर बाजार समितीवर भाजप आणि शिंदे गटाने वर्चस्व निर्माण केले आहे. शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे व भाजपचे डॉ. दिनेश परदेशी यांनी विजय मिळवत ही बाजार समिती ताब्यात घेतली आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar Vaijapur Market Committee Election Result
Chhatrapati Sambhaji Nagar Vaijapur Market Committee Election Result

छत्रपती संभाजीनगर : राज्यात आज बाजार समित्यांचे निकाल हाती येत आहेत. तब्बल ९४ बाजार समित्यांची मतमोजणी सुरू आहेत. यात छत्रपती संभाजी नगर येथील वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिंदेगट आणि भाजपणे आपले वर्चस्व निर्माण करत ही बाजार समिती ताब्यात घेतली आहे. शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांनी वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर आपले वर्चस्व कायम ठेवत भाजपच्या मदतीने येथील सत्ता काबीज केली आहे. भाजप-शिवसेना युतीला १० तर महाविकास आघाडीला पाच जागांवर समाधान मानावे लागले.

Nashik APMC Election : नाशिकच्या पिंपळगाव बाजार समिती निवडणूक मतमोजणीत राडा, दोन गट भिडले

राज्यात तब्बल ९४ बाजार समितीच्या निवडणूकीसाठी शुक्रवारी मतदान झाले. या निवडणुकची आज मतमोजणी सुरू आहे. अनेक ठिकाणी महाविकास घाडीने बाजी मारली आहे. तर काही ठिकाणी भाजपणे महाविकास आघाडीला शह देत विजय मिळवला आहे. छत्रपती संभाजी नगर येथील वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिंदेगट आणि भाजपणे आपले वर्चस्व निर्माण करत ही बाजार समिती ताब्यात घेतली आहे.

Indian Army: भारतीय लष्कराच्या तोफखाण्याची महिला अधिकारी सांभाळणार धुरा; शत्रूच्या चौक्या करणार उद्ध्वस्त

या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार अविनाश गलांडे, संजय निकम, ज्ञानेश्वर जगताप, अनिता वाणी, प्रशांत सदाफळ हे विजयी झाले तर भाजप-शिंदे गटाचे रामहरी बापू, काकासाहेब पाटील, कल्याण दागोडे, कल्याण जगताप, शिवकन्या पवार, नजन रजनीकांत, इंगळे गणेश पोपटराव, पवार प्रवीण लक्ष्मण, आहेर गोरख प्रल्हाद, त्रिभुवन प्रशांत उत्तमराव यांनी विजय मिळवला आहे.

वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा पिकासाठी ओळखली जाते. तब्बल ३ कोटी ४७ एवढी वार्षिक उलाढाल या बाजार समितीत होते. या निंवडणुकीत शिवसेना शिंदे गट, भाजप युतीच्या बळिराजा सहकारी विकास पॅनल व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी कॉग्रेस, भाजप व वंचित बहुजन आघाडी युतीच्या शेतकरी विकास पॅनलमध्ये लढत झाली.

IPL_Entry_Point

विभाग