मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Indian Army: महिला अधिकारी सांभाळणार भारतीय लष्कराच्या तोफखान्याची धुरा; शत्रूच्या चौक्याही उद्ध्वस्त करणार

Indian Army: महिला अधिकारी सांभाळणार भारतीय लष्कराच्या तोफखान्याची धुरा; शत्रूच्या चौक्याही उद्ध्वस्त करणार

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Apr 29, 2023 05:11 PM IST

Indian Army: भारतीय लष्कराच्या तोफखाण्याच्या रेजिमेंटमध्ये इतिहासात पहिल्यांदाच ५ महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या महिला आता शत्रूवर तोफगोळे आणि रॉकेट डागणार आहेत.

five women officers commissioned in army artillery for the first time
five women officers commissioned in army artillery for the first time

Indian Army artillery regiment Woman officer : भारतीय लष्करात आता महिलांना अधिकाधिक प्राधान्य दिले जात आहे. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत मुलींना संधि दिल्यावर आता भारतीय लष्कराच्या तोफखण्यात इतिहासात पाहिल्यांदा महिला अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. या महिला आता शत्रूवर तोफगोळे आणि रॉकेट डागणार आहेत. पाच महिला अधिकारी लष्कराच्या तोफखाण्यात भरती झाल्या आहेत.

Sambhaji nagar : पत्नी सोडून गेल्याने दारूच्या नशेत पतीने पोटच्या मुलांना फेकले विहिरीत; एकाचा मृत्यू

तोफखाना रेजिमेंटमध्ये आता महिलांना संधी दिली जाणार आहे. लष्कराच्या तोफखान्यात प्रथमच पाच महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लष्कराची प्रमुख शाखा असलेल्या आर्टिलरी रेजिमेंटमध्ये आज २९ एप्रिल रोजी ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी (OTA) चेन्नई येथे खडतर प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून पाच महिला अधिकारी आर्टिलरी रेजिमेंटमध्ये दाखल झाल्या आहेत. लष्करात आता पुरुष अधिकाऱ्या प्रमाणे महिला अधिकाऱ्यांना समान संधी दिल्या जाणार आहेत.

Ajit Pawar : “गौतमी पाटील बैलासमोर नाचेल नाहीतर…”, अजित पवारांची पुण्यात मिश्कील टिप्पणी

या तरुण महिला अधिकाऱ्यांची सर्व प्रकारच्या तोफखाना युनिटमध्ये नियुक्ती केली जाणार आहे. यात त्यांच्यावर रॉकेट, तोफगोळे डागणे, मध्यम क्षेत्र आणि शत्रूवर पाळत ठेवून त्यांच्या लष्करी ठिकाणांची माहिती घेऊन त्यांच्यावर हल्ला करणे या सारख्या आदी महत्वाच्या जबाबदाऱ्या या पाच महिला अधिकारी पार पडणार आहेत. उत्तरेकडील सीमेवर तैनात असलेल्या युनिट्समध्ये आणि इतर दोन रेजिमेंटमध्ये त्यांना तैनात करण्यात येणार आहे.

आर्टिलरी रेजिमेंटमध्ये नियुक्त केलेल्या महिला लष्करी अधिकाऱ्यांमध्ये लेफ्टनंट मेहक सैनी यांचा SATA रेजिमेंटमध्ये, लेफ्टनंट साक्षी दुबे आणि लेफ्टनंट अदिती यादव यांचा फील्ड रेजिमेंटमध्ये, लेफ्टनंट पवित्रा मौदगीलला मध्यम रेजिमेंटमध्ये आणि लेफ्टनंट आकांक्षा यांचा रॉकेट रेजिमेंटमध्ये समावेश करण्यात आला आहे. या समारंभाला लेफ्टनंट जनरल अदोष कुमार, कर्नल कमांडंट आणि तोफखाना संचालक (नियुक्त) यांच्यासह वरिष्ठ लष्करी अधिकारी, इतर मान्यवर आणि नवीन उपस्थित होते.

लष्करप्रमुखांनी केली होती घोषणा

आर्टिलरी रेजिमेंटमध्ये महिला अधिकार्‍यांचे द्योतक आहे. या वर्षी जानेवारीमध्ये लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी तोफखान्यात महिला अधिकाऱ्यांना नियुक्त करण्याचा निर्णय जाहीर केला होता, ज्याला नंतर सरकारने मान्यता दिली. आर्टिलरीमध्ये नियुक्त झालेल्या पाच महिला अधिकाऱ्यांची ही पहिली तुकडी आहे.

IPL_Entry_Point

विभाग